पिस्ता ची शेती

पिस्ता ची शेती
[Total: 180    Average: 2.9/5]

भारतात विविध अन्नपदार्थ बनविले जातात. चवीनुसार आणि प्रांतानुसार या पदार्थांमध्ये बदल होत असतो. भारतात अनेक ठिकाणी विविध पदार्थांमध्ये आणि मिष्टान्नांमध्ये सुका मेवा वापरला जातो. यापैकी महत्वाचा एक असा पिस्ता. जाणून घेऊया पिस्ता ची शेती कशी करतात.

भारतात पिस्ताच्या विविध जाती उपलब्ध होतात. यामध्ये जम्मू-काश्मीर मधील केरमन, पीटर, चिंकू, रेड, अलेप्पो आणि जॉली यांचा समावेश होतो. पिस्ता आपल्या चवीसाठी प्रसिद्ध आहेच, याबरोबरच पिस्ता मध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म दडले आहेत. कॅलरी कमी असलेल्या पिस्ता मध्ये एंटीऑक्सीडेंट्स,  विटामिन, मिनरल्स आणि मोठ्या प्रमाणात फाइबर चा समावेश आहे.

हवामान आणि तापमान

 • कोणत्याही पिकासाठी योग्य हवामान असणे अत्यंत गरजेचे आहे.
 • पिस्ता च्या पिकाला दिवसात जास्ती जास्त ३६ डिग्री सेंटीग्रेड तापमान चालू शकते.

जमीन आणि माती

 • विविध प्रकारच्या जमिनीमध्ये पिस्ता ची शेती करणे शक्य आहे. मात्र असे असले तरी लागवड करण्याआधी मातीची चाचणी करणे आवश्यक आहे.
 • ७.० ते ७. ८ सामू असलेली जमीन पिस्ता शेतीसाठी योग्य मानली जाते.

जमिनीची मशागत

 • पिस्ता शेतीसाठी जमिनीची खोलगट नांगरणी करणे आवश्यक आहे.
 • जमिनीच्या आत सहा ते सात फुटापर्यंत जर टणक भाग असेल तर तो तोडून जमीन समतल करावी. कारण पिस्ता ची मुळे जमिनीत खोलवर जातात.

रोप व्यवस्थापन

 • रोप लावण्यासाठी खोल खड्डा खणावा, यामुळे मुळे योग्य रीतीने सामावली जातील.
 • पाणी व्यवस्थापनावर रोपांमध्ये किती अंतर ठेवावे हे अवलंबून आहे.
 • सिंचन व्यवस्था असलेल्या बागेसाठी रोपांमध्ये 6 मीटर x 6 मीटर अंतर ठेवावे.
 • सिंचन व्यवस्था नसलेल्या बागेसाठी रोपांमध्ये 8मीटर x10 मीटर अंतर ठेवावे.

सिंचन व्यवस्थापन

 • पिस्ता च्या पिकाला कमी पाणी लागते तरी पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे.
 • पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास रोपाभोवती गावात टाकून ते ओले करावे.
 • पावसाळ्यात पाणी जमा होणार नाही याची खात्री करावी.

कापणी

 • पिस्ता च्या झाडाला उत्पादन सुरु होण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागतो.
 • पिस्ता चे झाड पाच वर्षानंतर उत्पादन देण्यास सुरुवात करते आणि रोप लागवडीच्या १२ वर्षानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु होते.
 • कापणी करताना अविकसित फळांची कापणी होणार नाही याची काळजी घ्यावी.

उत्पादन

 • पिस्ता चे उत्पादन हवामान, जाती तसेच शेती व्यवस्थापनाचा दर्जा यावर अवलंबून आहे.
 • लागवडीनंतर १० ते १२ वर्षांनी प्रयेक झाड ८ ते १० किलो उप्तादन देते.
Shares