Search

पीक संजीवकांचे नियोजन आणि फायदे – भाग – २

पीक संजीवकांचे नियोजन आणि फायदे  – भाग – २

पीक कोणतेही असो त्याचे उत्पादन घेताना तीन महत्वाचे टप्पे असतात. यामध्ये फुलधारणा, फळ धारणा आणि पीक काढणी किंवा कापणी हे महत्वाचे टप्पे आहेत. या तिन्ही टप्प्यांमध्ये पीक संजीवकांचा वापर केला जाऊ शकतो. म्हणूनच पीक संजीवकांचा योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. पीक संजीवकांचा नियोजन आणि फायदे या लेखाच्या दुसऱ्या भागात आपण विविध पिकांमध्ये पीक संजीवकांचे नियोजन कसे करावे यासंदर्भात माहिती घेऊया आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.
गहू आणि सोयाबीन :
wheatsoybean
या पिकांवर जिब्रेलिक आम्ल, डॅमिनोझाईड आणि 2, 4-डी या संजीवकांचा वापर केल्यास त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या मूलद्रव्यांचे जमिनीतून शोषण करण्याची क्षमता वाढते. यामुळे पिकाचे उत्पादन तर वाढतेच, परंतु त्यांच्या धान्यांतील प्रथिनांचे प्रमाण वाढून त्यांचा दर्जाही सुधारतो. गव्हाची उंची सायकोसिलसारखी निरोधके वापरून कमी करता येऊन त्यांची लोळण थांबविल्याने उत्पादनात घट होत नाही.
ऊस :
sugar-cane
उसाच्या पिकाचा कालावधी एक वर्षाचा असतो. तो कमी करण्यासाठी व त्यामध्ये साखरेचे प्रमाण वाढविण्यासाठी काही रासायनिक द्रव्यांचा वापर करतात. ऊस परिपक्वतेसाठी 2-4 डी, मॅलिक हायड्रॉझाईड, ट्रायडोबेन्झाईक आम्ल, डालफोन, इ.डी.टी.ए., सी.एम.यू., एम. सी.पी. आणि डी.सी.एम.यू. यांसारख्या रासायनिक द्रव्यांची फवारणी केल्यास उसाचे पीक लवकर पक्व होऊन त्याच्या वाढीचा कालावधी कमी होतो व उत्पादन वाढ होते. उसासारख्या पिकात उत्पादन वाढीसाठी तुरे येऊ न देणे फायद्याचे असते. मोनोयुरॉन, डाययुरॉन किंवा जास्त प्रभावी असे डायक्वॉट वापरून उसामध्ये तुरे पूर्णपणे थांबवता येतात.
explodem

खरेदी व अधिक माहितीसाठी क्लिक करा


लिंबूवर्गीय फळे :
lime-fruit
या वर्गातील फळांमध्ये त्यांचा रंग महत्वाचा असतो. लिंबूवर्गीय फळे 1000 पीपीएम एथोफॅनच्या द्रावणात बुडविली असता सात दिवसांत त्यांना पूर्णपणे पिवळा रंग प्राप्त होतो आणि बाजारात त्यांची विक्री सुलभरीत्या होते.
हिरवी केळी आणि कलिंगड :
green-bananawatermelon
पिकलेल्या केळ्यांना बाजारात चांगली मागणी असते. हिरवी केळी लवकर पिकविण्यासाठी त्याच्यावर दहा पीपीएम आय.ए. ए. आणि 10 पी.पी.एम. आय.बी.ए. या संजीवकाचा वापर केल्यास फळामध्ये रासायनिक बदल घडून केळी लवकर पिकतात. तर, कलिंगडाची फळधारणा झाल्यापासून तीस दिवसांनी त्यांची काढणी करून 4000 पी.पी.एम. एथोफॅनच्या द्रावणात दहा मिनिटे बुडवून काढली असता सर्व फळे दहा दिवसांत पूर्ण पिकतात.
पीक संजीवकांचे फायदे :

  • वनस्पतीच्या एखाद्या भागाचा किंवा संपूर्ण वनस्पतीचा विकास करणे शक्य आहे.
  • संजीवकांच्या वापरामुळे वनस्पती मधील फ़ुल धारणा आणि फळ धारणा वाढीसाठी होऊ शकतो.
  • अनावश्यक रोपांच्या वाढीवर नियंत्रण तसेच त्यांचे समुळ उच्चाटन करणे शक्य होते.
  • संजीवक वापरामुळे फुलधारणा अधिक जोमाने करता येते.
  • फळधारणा वाढवून किंवा फळांच्या आकारमानात वाढ केली जाऊ शकते.
  • पिकांचे उत्पन्न व दर्जा वाढविता येतो.

पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी स्वरूप चे एक्सप्लोड वापरा!

खरेदी व अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:explode

Related posts

Shares