Search

पीक संजीवकांचे नियोजन आणि फायदे   

पीक संजीवकांचे नियोजन आणि फायदे   

पीक वाढ संजीवकांना वनस्पती बाह्य संप्रेरक म्हणून देखील ओळखले जाते. वनस्पतींची वाढ नियमन करण्यासाठी तसेच कृषी उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी पीक संजीवक वापरणे आवश्यक आहे.पीक संजीवकांचे नियोजन आणि फायदे या लेखात आपण अशाच विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकणार आहोत.

विविध पिके आणि पीक संजीवकांचे नियोजन :

काकडीवर्गीय पिके :

cucumber

काकडीवर्गीय पिकांमध्ये फळधारणेसाठी मादी फुलापासून फळे मिळतात म्हणून नर फुलांचे प्रमाण व वाढ कमी करून मादी फुलांची संख्या अधिक प्रमाणात वाढवणे आवश्यक असते. यासाठी 100 पीपीएम जिब्रेलिक आम्ल वापरता येऊ शकते. काकडीच्या वेलीवर मादी फुले अधिक प्रमाणात येण्यासाठी व नर फुलांचे प्रमाण कमी करण्यासाठी 250 पीपीएम एथेफोन या संजीवकाची फवारणी फुलकळी निर्मितीच्या अगोदर केली जाऊ शकते.

explodem

खरेदी व अधिक माहितीसाठी क्लिक करा

 

टोमॅटो, वांगी :

tomatobrinjal

2, 4-डी आणि एन.ए.ए.च्या वापरामुळे टोमॅटो, वांगी यांची फळधारणा सुधारून उत्पन्न वाढते. टोमॅटो, वांगी यांची फळधारणा व त्यांची पक्वता होण्यासाठी 4-क्‍लोरोफिनॉकिझ ऍसेटिक आम्ल आणि 2-एन.ए.ए या कृत्रिम संजीवकाचा वापर करणे फायदेशीर ठरते. टोमॅटोची पूर्ण वाढ झालेली हिरवी फळे 1000 पी.पी.एम. एथोफॅनच्या द्रावणात एक मिनीट बुडवली, तर त्यांच्या रंगामध्ये सुधारणा होऊन फळे लवकर पिकतात.

भोपळा :  

pumpkin

भोपळा या पिकामध्ये फळधारणा व त्यांची पक्वता होण्यासाठी 4-क्‍लोरोफिनॉकिझ ऍसेटिक आम्ल आणि एन.ए.ए या कृत्रिम संजीवकाचा वापर करणे फायदेशीर ठरते.

अंजीर :

anjir

या पिकामध्ये मुळे फुटण्यासाठी, तसेच मुळांच्या संख्येत गुणात्मक वाढ करण्याकरता आय.बी.ए. हे ऑक्‍झिन वापरले जाते. 2, 4-डी आणि एन.ए.ए.च्या वापरामुळे अंजीर या पिकामध्ये फळधारणा सुधारून उत्पन्न वाढते. 4-क्‍लोरोफिनॉकिझ ऍसेटिक आम्ल आणि एन.ए.ए  यासारख्या कृत्रिम संजीवकांच्या वापरामुळे  फळधारणा अधिक होते तसेच फळे  लवकर पक्व होतात. अंजिराच्या फळांमध्ये फळांचा पुढील भाग लवकर पिकतो व देठाकडील भाग हिरवट राहतो, अशा फळांमध्ये समान परिपक्वता येण्यासाठी 5000 पी.पी.एम. एथेरेल द्रावणात फळे पाच मिनिटे बुडवून काढावीत.

या लेखाच्या पुढील (भाग – २) भागात आपण अजून काही पिकांसाठी पीक संजीवकाचे नियोजन कसे करावे याची माहिती आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.


पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी स्वरूप चे एक्सप्लोड वापरा!

खरेदी व अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:explode

Related posts

Shares