Search

पीक संरक्षण करण्याची साधने

पीक संरक्षण करण्याची साधने

रासायनिक कीडनाशकांची परिणामकारकता वाढविण्यासाठी ते अगदी सारख्या प्रमाणात कमीतकमी वेळेत व काइतकामी मनुष्यबळ वापरून व ज्याठिकाणी कीड आहे त्याठिकाणी मारण्यासाठी, कार्यक्षम अशा पीक संरक्षण करण्याची साधने महत्वाची भूमिका बजावतात.पीक संरक्षण साधनांचे वर्गीकरण खालील तीन प्रकारात करता येईल.

१) फवारणी यंत्रे (स्प्रेअर)
२) धुरळणी यंत्र (डस्टर्स)
३) इतर विविध पीक संरक्षण साधने

फवारणी यंत्रे(स्प्रेअर्स):

 • या साधनांचा उपयोग पाण्यात मिसळणारी भुकटी व द्रव, पाण्यात विरघळणारे द्रव इत्यादी स्वरूपातील कीडनाशके फवारणीसाठी होतो.
 • या साधनांमध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा वापरून नोझलच्या साहाय्याने फवारणी द्रावणाचे लहान थेंबांमध्ये (फवारा) रूपांतर करता येईल.
 • पाण्यावर दाब देऊन, वायुरूप आणि केंद्रभागी (सेंट्रिफ्युगल) अशा प्रकारच्या गतिजन्य शक्तीचा यासाठी वापर करण्यात येतो.
 • फवारणी यंत्रांची विभागणी दोन मुख्य विभागात करता येते.
 • १) मानवी शक्तीने चालणारी फवारणी
 • २) यंत्राच्या साहाय्याने चालणारी फवारणी

१) मानवी शक्तीने चालणारी फवारणी:

अ) बादलीतील पंप (बकेट किंवा स्टिरप पंप):

 • हा पम्प बादलीत ठेवतात किंवा तो बादलीला जोडलेला असतो. या पंपाचे एकमार्गी व दोनमार्गी असे दोन प्रकार आहेत.
 • एकमार्गी प्रकारात दट्ट्या फक्त खाली जातानाचा दाब निर्माण होतो त्यामळे सलग असा फवारा मिळत नाही.
 • दोनमार्गी प्रकारात मात्र एका नळकांड्यात दट्ट्या खाली जाताना व दुसऱ्यात दट्ट्या वर जाताना दाब निर्माण होतो,त्यामुळे फवाऱ्यात खंड पडत नाही.
 • हा पम्प वापरण्यासाठी दोन माणसांची गरज लागते आणि एका दिवसात साधारणपणे अर्धा हेक्टर क्षेत्रावर फवारणी करता येणे शक्य होते.

ब) पाठीवरील फवारणी पंप:

 • या पंपाची टाकी चपाती असून ती पाठीवर सहज बसते.
 • टाकीत सुमारे दहा ते चौदा लिटर द्रावण मावते.
 • पंपाचे हॅन्डल एका हाताने खाली-वर सुलभपणे करण्याची सोया असून दुसऱ्या हाताने फवाऱ्याची नळी धरून फवारा मारता येतो.
 • पंपाच्या नळीला द्रावण ढवळण्यासाठी मंथनक (एजिटेटर) जोडलेला असतो. त्यामुळे पंप चालू असताना द्रावण सारखे ढवळले जाते.
 • या पंपाचा उपयोग लहान झाडे, भाजीपाला व ठेंगणी पिके यांच्यावर फवारणी करण्यासाठी करता येतो.
 • एका दिवसात साधारणपणे अर्धा हेक्टर क्षेत्रावर फवारणी करता येते,आणि हे काम एक व्यक्ती सहज करू शकतो.

क) हवेच्या दाबाने चालणारा हॅन्ड कॉम्प्रेशन पंप :

 • या पंपात दहा ते वीस लिटर द्रावण मावेल अशा आकारमानाची पितळी किंवा स्टेनलेस स्टीलची टाकी असते आणि त्यातच हवेचा पंप बसवलेला असतो.
 • काही पंपांमध्ये दाबादर्शक यंत्रही बसविलेले असते.
 • फवारणी करण्यापूर्वी टाकीमध्ये पंपाच्या साहाय्याने हवा भरावी लागते.
 • या पंपाचा वापर करताना टाकी द्रावणाने पूर्ण भरू नये.
 • या पंपामध्ये मंथनक (एजिटेटर) नसतो, त्यामुळे फवारणी करताना अधूनमधून टाकी हलवीत राहावे.
 • या पंपाच्या मदतीने एक व्यक्ती एका दिवसात साधारणपणे अर्धा हेक्टर क्षेत्रावर फवारणी करू शकते.

ड) पाय पंप (फूट स्प्रेअर किंवा पॅडल पंप):

 • या पंपाची फवारणी यंत्रणा डुलत्या फवारणी पंपासारखीच असते.
 • या पंपात दट्या पायदळाच्या साहाय्याने वर-खाली करण्याची व्यवस्था केलेली असते.
 • हा पंप एका लोखंडी स्टॅण्डवर बसविलेला असतो.
 • या पंपाने प्रति दिवशी एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी करता येते.
 • या पंपातही रॉकिंग स्प्रेअर प्रमाणे दोन माणसे फवारणी करू शकतात.

Related posts

Shares