Search

पीक संरक्षण साधने – २

पीक संरक्षण साधने – २

कोणत्याही पिकाचे संरक्षण करताना विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर करावा लागतो. मागील भागात आपण विविध प्रकारच्या स्प्रे पंप्स बद्दल माहिती घेतली. पीक संरक्षण करण्याची साधने – २ या लेखात आपण धुरळणी यंत्र तसेच इतर महत्वपूर्ण यंत्रांबाबत विस्तृत माहिती घेऊया.

धुरळणी यंत्र:

या यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक घटक पिकांवर धुराळले जातात. पावडर स्वरूपातील कोरडी कीटकनाशके अतिशय सूक्ष्म भागात हवेच्या झोताने झाडावर धुरळली जातात.
धुरळणी यंत्राचे प्रकार :

अ) हाताने चालविण्याचे धुरळणी यंत्राचे तीन मुख्य प्रकार आहेत.

मुळांवर धुरळणी (रूट डस्टर):

 • परस बागेसाठी उपयुक्त मुख्य भाग लांब काटकोनीय ५० सें. मी. व्यासाचा असतो.
 • यामध्ये साधारण ५०० ग्राम (अर्धा किलो) पावडर भरता येते.

खाली धुरळणी (बिलो डस्टर):

 • खालच्या भागात असलेल्या कातड्याच्या दोन भागात लहान पेटी बसविलेली असते.
 • त्यामध्ये पावडर भरली जाते.
 • या धुरळणी यंत्राद्वारे एक दिवसात अर्धा हेक्टर क्षेत्रात धुरळणी करता येते.

चक्राकार धुरळणी (रोटरी डस्टर):

 • हे दोन प्रकारचे असते. १) चेस्ट टाईप, २) शोल्डर टाईप.
 • खांद्यावर लटकविण्याचे रोटरी डस्टर हे चेत टाईप धुरळणी यंत्रापेक्षा जास्त लोकप्रिय आहे.
 • कारण ते वाहून न्यायला व हाताळायला सुलभ आहे.
 • यंत्र खांद्याला लटकविण्यासाठी पट्टे असतात.
 • यंत्राचा वापर करताना पट्टे शरीराला बांधतात.
 • ओळींमध्ये पेरणी केलेल्या पिकात सहज आणि सारखी धुरळणी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
 • यामध्ये असलेल्या बिमूळत्या भांड्याची क्षमता ४ ते ५ कि.आणि एका दिवसात अर्धा ते एक हेक्टर क्षेत्रातील पिकांवर धुरळणी होते.

ब) शक्तीवर चालणारे धुरळणी यंत्र:

 • याध्ये स्वतंत्र इंजिन बसविलेले असते.
 • काम करताना यंत्राला इंजिन शक्ती प्रदान करते.
 • धुरळणी यंत्र ट्रॉलीवर बसविलेले असते.
 • त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात फळझाडांच्या पिकावर धुरळणी करण्यासाठी होतो.
 • या यंत्राच्या वापरासाठी २ किंवा ४ अश्वशक्तीच्या इंजिनाची आवश्यकता असते.
 • एका दिवसात ६ ते ८ हेक्टर क्षेत्रामध्ये धुरळणी करता येते.

Related posts

Shares