Search

पेरणी सबुरीने – हवामान खात्याचा सल्ला

पेरणी सबुरीने – हवामान खात्याचा सल्ला
[Total: 4    Average: 2.3/5]

buttons eng-minमान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्राच्या काही भागात हजेरी लावल्याने शेतकरी उल्हासित झाले होते. मान्सूनपूर्व पावसानंतर महाराष्ट्रातील शेती कामांना वेग आला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी देखील पावसाची चाहूल लागताच पेरणीच्या कामाला सुरुवात केली. मात्र हवामान खात्याने शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. याला कारण कि मान्सून लांबला आहे.

महाराष्ट्राच्या काही भागात पेरणी ची कामे वेगाने सुरु झाल्याचे लक्षात आल्यानंतर हवामान खात्याने हि सूचना जरी केली आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, डाळी यांसारख्या महागड्या बियाण्यांची पेरणी वाया जाऊ नये हा या मगच मुख्य उद्देश आहे. कारण मागील काही दिवसांपासून मराठ्वाध्याच्या काही भागात, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली होती.

हवामान खात्याकडून मान्सून राज्यात दाखल झाल्याची घोषणा केल्याखेरीज शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करू नये असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

मोठ्या प्रतिक्षेनंतर केरळात दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्राच्या वेशीवरच अडकून पडला आहे. “मान्सून लांबल्यामुळे पेरणी केल्यानंतर जर पाऊस पडला नाही तर पाण्याअभावी पेरणी वाया जाईल त्यामुळे जोपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रीय होत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांनी पेरणी करु नकाअसा सल्ला हवामान विभागाचे संचालक एन. चट्टोपाध्याय यांनी दिला आहे.

मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी सध्या पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल परिस्थिती नाही. मागच्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल झाला खरा मात्र कर्नाटकच्या काही भागात पोहोचल्यानंतर मान्सून पुन्हा मंदावला. मान्सून ७ जूनला दाखल होणार असा अंदाज यापूर्वी हवामान खात्याने वर्तवला होता. पण पोषक वातावरण नसल्यानं मान्सून अजून लांबणीवर गेला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी मान्सून दाखल होईपर्यंत कोणतीही पेरणी करु नका असा सल्ला त्यांनी शेतकर्‍यांना दिला आहे.

गेल्या काही दिवसात मराठवाड्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला. मात्र, या पावसावर विश्वास ठेवून तूर्तास पेरणी करु नये. कारण मान्सूनसाठी अजूनही अनुकूल स्थिती झाली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी करण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी, असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

Related posts

Shares