Search

सप्टेंबर महिन्यातील फळबागांची काळजी

सप्टेंबर महिन्यातील फळबागांची काळजी
[Total: 21    Average: 2.4/5]

सप्टेंबर चा महिन्यात पावसाचा जोर कमी झालेला असतो. लागवड केलेली फळझाडे जोम धरू लागलेली असतात. पावसाच्या कमतरतेमुळे फळझाडांवर ताण पडणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सप्टेंबर महिन्यात फळबागांची काळजी नेमकी कशी घ्यावी याचा आढावा घेऊया.

फळबागांची काळजी घेताना काय कराल?

 • पावसाचा अंदाज घेऊन आणि पाण्याचे योग्य नियोजन करून नवीन फळझाडांची लागवड चालू ठेवावी.
 • जर पाऊस अधिक प्रमाणात झाला असेल पाणी साचले असेल तर अतिरिक्त पाणी बागेतून बाहेर काढावे.
 • पाऊस कमी झाला असेल तर सिंचनाच्या माध्यमातून रोपांना पाणी द्यावे यामुळे रोपांवर पाण्याचा ताण पडणार नाही.
 • अंजिराच्या रोपाची आवश्यकतेनुसार छाटणी करावी. छाटून झाडावर राहिलेल्या फांद्याच्या मध्यभागी एक ते दोन डोळ्यांच्या पुढील बाजूस आवश्यकतेनुसार तिरका काप द्यावा. तसेंच डोळ्यावर ५०० पी.पी.एम. इथरेलचा फवारा द्यावा. त्यामुळे डोळे चांगले फुटतील.
 • जमिनीत चर काढून प्रत्येक झाडास ४ ते ५ घमेली शेणखत, ५०० ग्रँम नत्र, २५० ग्रँम स्फुरद, २७५ ग्रँम पालाश छाटणीच्या वेळी द्यावे. योग्य काळजी घेऊन पाणी द्यावे.
 • डाळींबावर जर बुरशीची लागण झाल्याचे निदर्शनास आले तर बुरशीजन्य (बिबव्या) रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन ५० ग्रँम + मॅनकोझेब ५०० लिटर पाण्यातून फवारावे. दुसरी फवारणी १५ दिवसांनी करावी.
 • पेरु पिकामध्ये फळधारणा झाल्यापासून दर १५ दिवसांच्या अंतराने मँन्कोझेब (०.२ टक्के) + कार्बेन्डँझीम (०.१ टक्का) यांच्या ६ फवारण्या केल्यास देवी रोगाच्या नियंत्रणासाठी याचा फायदा होतो.
 • केळीच्या पिकाला खताचा हप्ता द्यावा यासाठी लागवड झाल्यानंतर २ महिन्यांनी प्रति झाडास ३५ ग्रँम प्रमाणे नत्राचा पहिला हप्ता द्यावा.
 • आंबा पिकाची काळजी घेताना वाळलेल्या फांद्या तोडून घ्याव्या. पिकाला मर रोग झाल्याचे निदर्शनास आले तर फांद्या निरोगी भागासहित कापून घ्याव्यात व त्यावर बोर्डोपेस्ट लावावी. खोडावरील वाळलेली साल काढावी व त्यावर बोर्डोमिश्रण पेस्ट (१० टक्के) चोळावे.
 • लिंबाच्या झाडाची योग्य पाहणी करून रोगग्रस्त फांद्या, पाने कापून जाळून नष्ट कराव्या. झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराइड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन एक ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • साधारणतः एक वर्ष वयाच्या संत्रा झाडास १०८ ग्रॅम युरिया किंवा २५० ग्रॅम अमोनियम सल्फेट व १५७ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, २५ ग्रॅम झिंक सल्फेट, २५ ग्रॅम फेरस सल्फेट आणि २५ ग्रॅम मॅंगनीज सल्फेट द्यावे.
 • दोन वर्षाचे झाडास दुप्पट, तीन वर्षांचे झाडास तीनपट व चार किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडासाठी चौपट खताची मात्रा द्यावी. फळगळ कमी करण्याकरिता, १.५ ग्रॅम जिबरेलीक आम्ल अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • दुसरी फवारणी १५ दिवसांनंतर पुन्हा करावी. तसेच यातील पाने खाणारी अळी नियंत्रणासाठी डायमेथोएट १.५ मि.लि. किंवा फेनवरलेट २ मिलि किंवा साईपरमेथ्रिन (२५ ई.सी.) १ मिलि किंवा फेनिट्रोथिआन २ मिलि फवारणी करावी.

Related posts

Shares