Search

फळे व भाजीपाला प्रक्रियेचे महत्व

फळे व भाजीपाला प्रक्रियेचे महत्व

कृषिप्रधान देश असलेल्या भारतात भाजीपाला आणि फळे मोठया प्रमाणात उत्पादित होतात. विविध शासकीय योजनांमुळे मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड वाढली आहे. यामुळे फळे व भाजीपाल्याचे उत्पादन देखील वाढले आहे. मात्र असे असले तरी फळे आणि भाजीपाल्याच्या काढणीनंतरच्या प्रक्रिया तंत्रज्ञान क्षेत्रात भारत खूपच पिछाडीवर आहे. त्यामुळेच काढणीनंतर जवळपास ३० ते ४० टक्के उत्पादनाचे नुकसान होते. या लेखात आपण ‘फळे व भाजीपाला प्रक्रियेचे महत्व’ जाणून घेणार आहोत.

फळे व भाज्या हा माल ‘अति नाशवंत’ (Perishable) म्हणून ओळखला जातो. काढणीनंतर काही काळातच त्यांचा ताजेपणा खराब होऊन ते खराब होऊ शकतात. यामुळेच आवक वाढल्यास बाजारपेठेत उत्पादनांची विक्री नगण्य भावाने करावी लागते. हे करताना बऱ्याच वेळा उत्पादन खर्च देखील आणि निघत नाही यामुळे शेतकरी बांधवांना नुकसान करावे लागते. काढणीनंतर भाजीपाला किंवा फळांचे नुकसान होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये अयोग्य काढणी किंवा तोडणी, त्यांची हाताळणी प्रतवारीचा अयोग्य प्रकार, कमकुवत विक्री व्यवस्थापन, अकुशल कामगार वर्ग, साठवणुकीचा अभाव व अपुरी भांडवल व्यवस्था यांसारख्या विविध कारणांचा समावेश होऊ शकतो. यामुळे ३० टक्के माल वाया जातो म्हणजे अंदाजित ६००० कोटींचा माल खरेदीदारांपर्यंत पोहोचतच नाही.

फळे व भाज्यांवर प्रक्रिया(Processing) केल्यास उत्पादित पदार्थांच्या माध्यमातून चांगली किंमत मिळू शकते. त्यात ज्या प्रक्रिया पदार्थांना देशात व परदेशात मागणी आहे अशा पदार्थांवर प्रक्रिया केल्यामुळे नुकसान टाळता येऊ शकते. म्हणूनच फळे व भाज्यांवर प्रक्रिया करणे काळाची गरज आहे.

फळे व भाज्यांवर प्रक्रिया करण्याचे फायदे

  • प्रक्रिया केल्यामुळे फळे व भाज्या बिगर हंगामात उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांची वर्षभर चव चाखता येते.
  • ज्या भागात फळे व भाज्या पिकात नाहीत. अशा ठिकाणी त्या उपलब्ध करून देता येतात.
  • बाजारपेठेत फळे व भाज्यांची अवाक वाढून दर घसरतो. अशा स्वस्त फळे व भाज्यांवर प्रक्रिया करून चांगली किंमत मिळविता येते.
  • प्रक्रियायुक्त पदार्थ निर्जंतुक केल्यामुळे खाण्यासाठी सुरक्षित असतात.
  • आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रक्रियायुक्त डबाबंद फळे व भाज्यांचा उपयोग होतो.
  • विशिष्ट फळे व भाज्या ज्या देशात पिकत नाहीत, अशा ठिकाणी निर्यात करून परकीय चलन मिळविता येते.

Related posts

Shares