Search

फुलधारणेत पीक संवर्धकांची भूमिका

फुलधारणेत पीक संवर्धकांची भूमिका

पीक कोणतेही असो त्याचे उत्पादन घेताना तीन महत्वाचे टप्पे असतात. यामध्ये फुलधारणा, फळ धारणा आणि पीक काढणी किंवा कापणी हे महत्वाचे टप्पे आहेत. या तिन्ही टप्प्यांमध्ये पीक संवर्धकांचा वापर केला जाऊ शकतो. म्हणूनच पीक संवर्धकांचा योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. पीक संवर्धकांचा नियोजन आणि फायदे या लेखाच्या दुसऱ्या भागात आपण विविध पिकांमध्ये पीक संवर्धकांचे नियोजन कसे करावे यासंदर्भात माहिती घेऊया आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

फुलगळ का होते?

 • वातावरणातील तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे, सापेक्ष आर्द्रता ४०-६० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असणे, फुलधारणा होताना असलेला सोसाट्याचा वारा, फुलधारणा अवस्थेत पाण्याची कमतरता,
  फुलधारणेतील किडी/ रोगांचा प्रादुर्भाव, मावा, फुलकिडे या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास फुलगळ होते, “मर’ रोगाचा प्रादुर्भाव असल्यासही फुलगळ होते.
 • फुलधारणा अवस्थेत पाऊस झाल्यास बागेत जास्तीचा ओलावा निर्माण झाल्यामुळे फुलगळ होते.
 • फळझाडांमध्ये नर व पुंकेसर व स्त्रीकेसर एकाच फुलात असणारी फुले येतात, सर्व नर फुले परागीकरणानंतर काही काळाने आपोआपच गळून पडतात.
 • परागीकरणाच्या अभावी परागीकरण न झालेली द्विलिंगी फुले तशीच वांझ राहून गळून पडतात.
 • झाडावर जर द्विलिंगी फुलांची संख्या जास्त झाली तर अन्नद्रव्यासाठी होणाऱ्या स्पर्धेस आळा घालण्यासाठी झाड स्वतःहून फुलगळ करते.
 • अन्नद्रव्यांचा पुरवठा पुरेसा नसल्यामुळेही फुलगळ होते. (उदा.- अतिजास्त अथवा अतिशय कमी प्रमाणात केलेला नत्रयुक्त खतांचा पुरवठा.)

फुलधारणेसाठी काय कराल?

 • बाग नेहमी स्वच्छ ठेवावी.
 • पूर्वीच्या बहाराच्या एकमेकांना छेदणाऱ्या, तसेच वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी.
 • बहार संपल्यावर किमान ३-४ महिने विश्रांती द्यावी.
 • विश्रांती काळात असताना फक्त जगण्याइतपत पाणी झाडांना द्यावे.
 • पानगळीसाठी इथरेल २ ते २.५ मिलि प्रति लिटर याप्रमाणे फवारावे.
 • आडव्या फुटलेल्या फांद्यांची हलकी छाटणी ५-१० सें.मी.पर्यंत ठेवून करावी.
 • नवीन फुलधारणेच्या पूर्वी पाण्यावर नियंत्रण ठेवावे.
 • पानगळीच्या नंतर ३-४ आठवड्यांनी कळी यायला सुरवात होते.

फवारणी कशी आणि कधी कराल?

 • फुलगळतीवर बाजारात विविध उत्पादने उपलब्ध आहेत.
 • यापैकी स्वरूप चे फ्लोरेट हे उत्पादन अतिशय प्रभावी उत्पादन आहे.
 • फ्लोरेट हे पुनरुत्पादक फुलांची संख्या वाढविण्यासाठी एक प्रभावी उत्पादन आहे.
 • याची फवारणी केल्यानंतर पिकाची उत्पादनक्षमता वाढते. या प्रक्रियेमुळे मादी / प्रजनन फुलांच्या संख्येत वाढ होते.
 • तसेच नर फुलांच्या तुलनेत मादी फुलांच्या प्रमाणात वाढ होते.
 • फवारणीसाठी एक लिटर पाण्यामध्ये १ मि. ली. फ्लोरेट टाकून मिश्रण तयार करावे.
 • पहिली फवारणी फुलोऱ्यापूर्वी (मोहोरापूर्वी) २५ ते ३० दिवस आधी करावी.
 • दुसरी फवारणी फुलोऱ्यानंतर १२ ते २० दिवसासनंतर करावी.

पीक संवर्धकांचे फायदे:

 • नर फुलांच्या तुलनेत मादी फुलांच्या प्रमाणात वाढ करण्यास मदत करते. याचा सकारात्मक परिणाम होऊन उत्पादनक्षमता ३० ते ४० टक्के वाढते.
 • वनस्पती मधील फ़ुल धारणा आणि फळ धारणा वाढीसाठी होऊ शकतो.
 • अनावश्यक रोपांच्या वाढीवर नियंत्रण तसेच त्यांचे समुळ उच्चाटन करणे शक्य होते.
 • फुलधारणा अधिक जोमाने करता येते.
 • फळधारणा वाढवून किंवा फळांच्या आकारमानात वाढ केली जाऊ शकते.
 • पिकांचे उत्पन्न व दर्जा वाढविता येतो.

खरेदीसाठी व अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा ⇓

जिल्हा:

Related posts

Shares