Search

बहुपयोगी बांबूची शेती

बहुपयोगी बांबूची शेती

बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो. बांबूचा उपयोग शेतीसाठी तसेच शोभेच्या वास्तू बनवण्यासाटी केला जातो, अशा या बहुउपयोगी बांबू वनस्पती लागवड बद्दल जाणून घेऊ!

प्रजाती:

 • अखंड पृथ्वीतलावर बांबूच्या सुमारे १४०० प्रजाती आहेत.
 • यातील १४० प्रजाती भारतात आहेत, पैकी ६० प्रजाती या लागवडीखाली आहेत.
 • त्यात बांबूसा आणि डेंड्रोकॅलॅमस या २ जाती प्रमुख असून, त्या देशात सर्व ठिकाणी वाढतात.
 • महाराष्ट्रात मानवेल, कटांग-काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू, चिवळी या प्रजाती आहेत; तर कळक,
  मेज, चिवा, चिवारी, हुडा बांबू, मोठा बांबू, पिवळा बांबू असे लांबी व गोलाई यांवरून बांबूचे प्रकार पडलेले आहेत.

मानवेल:

 • हा प्रकार महाराष्ट्राच्या सगळ्या भागांत आढळतो.
 • त्याची उंची ८ ते १६ मीटरपर्यंत, तर व्यास २ ते ८ सें.मी.पर्यंत असतो.
 • एक पेर ३० ते४५ सें.मी. लांबीचे असते.
 • बुरुड काम करणारे टोपल्या, सुपे यांसारख्या वस्तूंच्या निर्मितीसाठी या प्रकारचा बांबू वापरतात.

कटांग, काटस:

 • या जातीचे बांबू १५ ते ३० मीटर उंच आणि ३ ते ७ सें.मी. व्यासाचे असतात.
 • त्यांचे एक पेर २५ ते ४५ सें.मी. लांबीचे असते. कुंपण व घरबांधणीसाठी याचा उपयोग होतो.

कोंड्या मेस:

 • याची उंची १६ ते २३ मीटर, व्यास ८ ते १५ सें.मी. तर पेराची लांबी २० ते ४५ सें.मी. एवढी असते.
 • याचा वापर बारीक विणकाम करण्यासाठी,फर्निचर बनविण्यासाठी करतात.

पिवळा बांबू:

 • घरात किंवा बागेत शोभेसाठी लागवड.

चिवळी:

 • याची उंची ९ मीटर, व्यास २ ते ४ सें.मी., तर पेर १५ ते ३० सें.मी. लांबीचे असते.
 • टोपल्या व घरबांधणीसाठी या बांबूचा उपयोगकरतात.

जमीन व हवामान:

 • बांबूच्या व्यावसायिक पद्धतीने लागवडीसाठी बारमाही पडीक ते कायमस्वरूपी सुपीक आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी
  जमीन असणे गरजेचे असते पाणथळ जमिनीमध्ये बांबू वाढत नाही. क्षारपड, पानथळ जमिनी बांबूच्या लागवडीसाठी योग्य नाहीत.
 • बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते.
 • तसेच कोरड्या हवामानातहीबांबू चांगला वाढतो. पाणी देण्याची सोय असल्यास बांबूची लागवड सर्वसाधारणपणे ८ ते २५
  अंश सेल्शिअस तापमान आणि सरासरी प्रति वर्षी७५० मि.मी. पाऊसमान असणाऱ्या प्रदेशात करावी.

काढणी, लागवड व उपयोग या बद्दल माहिती पुढील भागात जाणून घेऊ !

Related posts

Shares