Search

ब्रोकोली लागवड !

ब्रोकोली लागवड !

स्प्राऊन्टिंग ब्रोकोली या परदेशी भाजीपाला पिकाचे शात्रीय नाव ‘ब्रासिका ओलेरेसिया व्हरा इटालिक’ असे आहे. ब्रोकोली आणि आपल्या नेहमीच्या खाण्यातील कोबी, फ्लॉवर यांचे कूळ, जाती आणि प्रजाती एकच आहेत. या भाजीचे मूळस्थान इटली आहे.

जगात ब्रोकोली उत्पादनात चीन अग्रस्थानी आहे. भारतात हि बऱ्याच ठिकाणी उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात ब्रोकोलीची लागवड लहान क्षेत्रात केली जाते. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरात ती विक्रीसाठी पाठवली जाते.हि ब्रोकोली मुंबई, चैन्नई,दिल्ली , कोलकता येतील हॉटेल्ससाठी पाठवली जाते.

ब्रोकोलीचे आहारातील महत्व

 • ब्रोकोली गड्ड्याचा रस काढून शरीर आरोग्य जपण्यासाठी पेय म्हणून वापर करतात.
 • भारतात मुख्यत्वे करून ब्रोकोलीचा हिरवे सॅलेड या स्वरूपात आहारात उपयोगात करतात.
 • ब्रोकोलीत पाणी, कॅलरीज, कर्बोदके, साखर, तंतुमय तसेच स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे व विविध खनिजे असतात.
 • ब्रोकोलीच्या गड्ड्यांत महत्वाची अँटी-ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग रोखणे शक्य होते.

हवामान

 • ब्रोकोलीचे उत्पादन थंड हवामानात अतिशय उत्तम येते
 • ज्या भागात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणीही लागवड करता येते
 • दिवसा २० ते २५ अंश से. तापमान रोपांची वाढ होण्यासाठी आवश्यक असून, गड्डा तयार होतेवेळी तापमान १५ ते २० अंश जरुरीचे आहे
 • हरितगृहात रोपांची वाढ होण्यासाठी दिवसाचे तापमान २० ते २५ अंश जरुरीचे आहे
 • गड्डे लावणीच्या वेळी रात्रीचे व दिवसाचे तापमान अनुक्रमे १५ ते २० अंश, तर ७० टक्के नियंत्रित करावी

जमीन

 • रेताड, मध्यम, काळी, निचऱ्याची जमीन या पिकास चांगली असते. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असावा
 • शेवटच्या कुळवणी वेळी एकरी १२ ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून टाकावे
 • हरितगृहात लागवड करण्यासाठी हरितगृहातील तयार केलेले माध्यम फॉरमॅलीन या रसायनाद्वारे करावे
 • त्यानंतर ६० से.मी. रुंद , ३० से.मी.उंच व दोन गादीवाफ्यामध्ये ४० से.मी.अंतर ठेवावे
 • हरितगृहामध्ये एकरी ४० मीटर लांबीचे एकूण १०० गादी वाफे तयार होतात

जात

ब्रोकोली
ब्रोकोलीच्या जाती

ब्रोकोली पिकात हिरवे गड्डे, जांभळे गड्डे, फिकट गड्डे आणि पांढऱ्या रंगाचे गड्डे असे प्रकार आहेत.बियाणे विकत घेताना त्याचे उत्पादन, पीक किती दिवसांत काढणीस तयार होते आदी सर्व गोष्टींची माहिती घ्यावी.

हिरवे गड्डे

 • भारतात हिरव्या गडद रंगाच्या गड्ड्यांचे वाणच अधिक लोकप्रिय आहेत
 • महाराष्ट्रात लागवडीसाठी ‘पालम समृध्दी’ हा वाण चांगला असून तो जास्त उत्पादन देणारा आहे
 • हिरव्या रंगाचा हा गड्डा ३०० ते ४०० ग्रॅमचा असतो

जांभळे गड्डे

 • जांभळ्या रंगाचे वाण कड्याक्याची थंडी सहन करू शकतात आणि ऐन हिवाळ्यात काढणीस येतात
 • सॅलेडमध्ये या जातीचा सुद्धा उपयोग केला जातो

पुसा केटीएस-१

 • या मध्यम उंचीच्या वाणाचे गड्डे अतिशय घट्ट व गडद हिरव्या रंगाचे असतात

लागवड

 • एकरी सुमारे २६,६६० इतकी रोपे बसतात
 • लागवड दुपार नंतर करावी
 • त्यानंतर रोपांना ठिबकद्वारे पाणी दयावे
 • लागवड करताना रोपांची मुळे ॲझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धकाच्या द्रावणात बुडवून लावावीत
 • हरितगृहात लागवड प्रत्येक गादीवाफयावर ३० बाय ३० सें.मी. अंतरावर करावी

खत व्यवस्थापन

 • सर्वप्रथम माती परीक्षण करून जमिनीतील उपलब्ध मुख्य व् सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती घ्यावी
 • एकरी ६० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ७० किलो पालाश देणे आवश्यक आहे
 • माती परीक्षण अहवालाप्रमाणे मॉलिब्डेनम आणि बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून द्यवीत
 • ब्रोकोली पानांचा शेंडा खुरटलेला राहणे व गड्डा न भरणे ही मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे
 • विशेषतः आम्लीय जमिनीत (सामू ५.५ च्या खाली) ही विकृती दिसून येते

ब्रोकोली चे कीड नियंत्रण, काढणी व मार्केटिंग याबाबतची माहितीसाठी क्लिक करा

Related posts

Shares