Search

ब्रोकोली लागवड-पश्चात तंत्रज्ञान!

ब्रोकोली लागवड-पश्चात तंत्रज्ञान!

मागील भागात आपण ब्रोकोली लागवडीबद्दल माहिती घेतली.
या भागात ब्रोकोलीचे कीड नियंत्रण, काढणी उत्पादन, पॅकिंग आणि साठवणूक या बाबत जाणून घ्या!

कीड नियंत्रण:

काळी माशी:

ब्रोकोली

लक्षणे:

 • ही माशी पानांच्या पेशींत अंडी घालते.
 • रोपांची वाढ खुंटते.
 • रोपांचा शेंडा अळ्यांनी खाल्यास त्यास गड्डा धरत नाही.

नियंत्रण:

 • मॅलॅथिऑन (50 ईसी) 20 मि.लि. प्रति 10 लि.पाण्यातून पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

मावा:

ब्रोकोली

लक्षणे :

 • हिरव्या किंवा पांढऱ्या रंगांचे मावा किडे पानातील अन्नरस शोषून घेतात,
 • त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होउन पिवळी पडतात आणि कालांतराने वाळून जातात.

नियंत्रण:

 • नियंत्रणासाठी ०.०५ टक्के मॅलॅथिऑन ५० इ. सी निमअर्क ४ टक्के या औषधांच्या १० – १२ दिवसानंतर ३ ते ४ फवारण्या कराव्यात.

चौकोनी ठिपक्‍यांचा पतंग

ब्रोकोली

लक्षणे:

 • अळी पानांच्या खालच्या बाजूस राहून, पानांना छिद्रे पाडून पानांतील हरितद्रव्य खाते.
 • हि कीड सप्टेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत कार्यक्षम असते.

नियंत्रण:

 • पिकांवर पहिली फवारणी दोन अळ्या प्रति रोप दिसू लागताच बीटी जिवाणूवर आधारित कीटकनाशक 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून करावी.
 • ट्रायकोग्रामा हे मित्रकीटक प्रति हेक्‍टरी एक लाख या प्रमाणात सोडावे.
 • फेनव्हरलेट २० इसी ५० ग्रॅम ए. आय. प्रती हेक्टर या प्रमाणात १५ दिवसाच्या अंतराने फवारावे.

काढणी व उत्पादन:

 • वाणपरत्वे ब्रोकोलीचा गड्डा ६० ते ७० दिवसांत लागवडीपासून काढणीस तयारहोतो.
 • विक्रीच्या द्रुष्टीने व चांगला दर मिळण्याच्या द्रुष्टीने गड्ड्यांचा व्यास ८ ते १५ सें.मी.असतानाच काढणी करावी.
 • यार गड्डे साधारणपणे १५ सें.मी. लांबीचा दांडा ठेवून कापून घ्यावेत.
 • मुख्य गड्डा काढून घेतल्यानंतर खाली पानांच्या बेचक्यातून येणारे गड्डे पोसण्यास वाव मिळतो.
 • प्रत्येक गड्ड्याचे वजन सरासरी ३०० ते ४०० ग्रॅम असणे आवश्यक आहे.
 • एकरी ४० गुंठे क्षेत्रातून सुमारे ८ ते ९ टनांपर्यत गड्ड्यांचे उत्पादन मिळते.

पॅकिंग:

 • गड्डयांची काढणी झाल्यावर त्यातील उष्णता बाहेर काढून टाकण्यासाटी गड्डयांचे पूर्व शीतकरण शून्य अंश से. ते २ अंश से तापमानात करून घेणे आवश्यक असते.
 • आकारमान किंवा वजनाप्रमाणे प्रतवारी करून गड्डे स्वच्छ करावेत.
 • वायूवीजनासाठी छिद्रे असलेल्या कोरुगेटेड बॉक्समध्ये ते ३ किंवा ४ थरांपर्यंत भरावेत.
 • पॅकिंग केलेल्या बॉस्केसची रात्री (तापमान कमी असल्याने) वाहतूक करावी किंवा प्लास्टिक ट्रेमध्ये सभोवती बर्फ ठेवून तापमान कमी करून क्रेटमधून वाहतूक करावी.

साठवणूक:

 • गड्डयांची काढणी झाल्यानंतर खोलीच्या तापमानात(रूम टेंपरेचर )गड्डा दोन दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतो.
 • परंतु गड्डे पूर्वशीतकरण झाल्यानंतर शीतकरून शून्य अंश से.तापमानात व ९५ ते ९८ टक्के सापेक्ष आद्रतेत २ ते ३ आठवड्यांपर्यंत चांगल्या स्थितीत साठवून टेवता येतात.

विक्री व्यवस्थापन:

ब्रोकोली या पिकाला मोठी शहरे आणि हॉटेल्स उदयोगात प्रचंड मागणी असते. तसेच या भाजीची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते.ब्रोकोलीची विक्री आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील कंपन्यांशी संपर्क करा:

 • सुनीता अॅग्रो (पुणे)
  08043046330
 • श्री इंटरप्राईस (पुणे)
  08046049594
 • नेचर फ्रेश अॅग्रोवेट (मुंबई)
  09643206321
 • बी.बी.सी ट्रेडिंग कंपनी (मुंबई )
  09643007915

Related posts

Shares