Search

भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये- भाग 2

भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये- भाग 2

आपण “भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये” या लेखाच्या पहिल्या भागात विविध पिकांमध्ये खाण्यायोग्य भागांच्या वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये वेगवेगळी असतात. या अन्नद्रव्यांच्या योग्य वापरामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, उत्पादनाचा आकार आणि दर्जा वाढतो. मागील भागात आपण मूळ अन्नद्रव्ये आणि मुख्य अन्नद्रव्ये यांबाबत माहिती जाणून घेतली. या भागात आपण रोपांसाठी आवश्यक अशा दुय्यम अन्नद्रव्यांबाबत माहिती घेऊया. कॅल्शियम,गंधक आणि मॅग्नेशियम हि तीन दुय्यम अन्नद्रव्ये आहेत. यांचा वापर वनस्पतींच्या वाढीदरम्यान महत्वाची भूमिका बजावतो.

कॅल्शियम:

 • कॅल्शियम हा वनस्पतींच्या पेशींच्या आवरणाचा एक घटक असून त्यामुळे पिकांच्या खोडाला आणि झाडाला कठीणपणा येतो.
 • कॅल्शियमच्या पुरवठ्यामुळे लहान अवस्थेत मुलांची चांगल्या प्रकारे वाढ होते.
 • वनस्पतीची वाढ होत असताना तयार हणाऱ्या काही सेंद्रिय आम्लांचा विषारीपणा कॅल्शियममुळे नाहीसा केला जातो.
 • कॅल्शियममुळे वनस्पती पाण्याचा पुरेपूर उपयोग करून घेतात.
 • जमिनीचा सामू योग्य मर्यादेमध्ये राखला जातो.
 • त्यामुळे पिकांना इतर अन्नद्रव्यांच्या शोषणक्रियेत मदत होते.
 • कॅल्शियममुळे बीजनिर्मितीसाठी चालना मिळते.

गंधक:

 • गंधक हा हरिद्रव्याचा घटक नसला तरी हरिद्रव्याच्या निर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो.
 • गंधामुळे वनस्पतीची शारीरिक वाढ जोमाने होते.
 • निरनिराळ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते. बीजनिर्मितीसाठी चालना मिळते.
 • शेंगवर्गीय वनस्पतीच्या मुळावरील गाठीच्या प्रमाणात वाढ होते तसेच तेलबियांमध्ये तेलाचे प्रमाण वाढते, म्हणून शेंगवर्गीय व तेलबियावर्गीय वनस्पतींना गंधकाची जास्त प्रमाणात आवश्यकता असते.

मॅग्नेशियम:

 • वनस्पती पेशीतील हरितकण, मायटोकाँड्रिया, रायबोसोम आणि एन्झाइम्स यांच्या कार्यात प्रत्येक अवस्थेत सहाय्य्यभुत घटक म्हणजे मॅग्नेशियम होय.
 • क्लोरोफिल A व क्लोरोफिल B यांच्यातील महत्वाचा घटक असून पानांतील मॅग्नेशियमचा १०% भाग हा त्यात सामावलेला आहे.
 • त्यामुळे प्रकाश संश्लेषणक्रियेवर परिणाम होतो.
 • या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे जुन्या पानांवर पिवळेपणा व सुरकुत्या दिसतात.
 • शिरा हिरव्या राहून बाकीचा भाग पिवळा होतो. पानांच्या कांदा हिरव्याचं राहतात.
 • याची लक्षणे पीक प्रकव होताना जास्त प्रमाणात दिसतात.
 • त्यामुळे मालाची गुणवत्ता खालावते. पाण्याचा ताण किंवा अतिपाणी साचणे, जमीन घट्ट होणे, वाळूचे प्रमाण जास्त असणे यामुळे वनस्पतीत मॅग्नेशियमची कमतरता दिसते.
 • कोबीवर्गीय पिके, कांदा, वाटाणा, गाजर, घेवडा, बिट इत्यादी पिके कमरतेस बळी पडतात

या लेखाच्या पुढील आणि शेवटच्या भागात आपण विविध सूक्ष्म अन्नद्रव्यांबाबत माहिती जाणून घेऊया.

Related posts

Shares