Search

भाजीपाला रोपवाटीका व्यवस्थापन

भाजीपाला रोपवाटीका व्यवस्थापन
[Total: 12    Average: 2.8/5]रोपाची वाढ आणि संगोपन केले जाते त्या जागेला रोपवाटिका असे म्हणतात.
भाजीपाला पीकाची जोमदार व निरोगी रोपे तयार करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी ,
1. हरळी किंवा लव्हाळा असणारी जमिन रोपवाटीकेसाठी वापरु नये .भाजीपाला रोपवाटीकेसाठी सपाट जमीन निवडावी .जमिनीची माती काळी व उत्तम निचरा होणारी असावी .
2. रोपवाटीका घरापासून जवळ असावी म्हणजे दररोज रोपवाटीकेची काळजी घेतायेईल .
3. रोपवाटीकेच्या क्षेत्रासाठी खोलवर ( २० -२५ सें .मी )नांगरणी करून २ -३ कुळवाच्या पाळ्या देवून जमीन भुसभुशित करावी .
4. रोपवाटिका तयार करण्यापूर्वी जमीनीत चागले कुजलेले शेणखत टाकावे.
5. रोपवाटीकेचे पावसापासून आणि वादळापासून संरक्षण करण्यासाठी शेड तयार करावे.
6. रोपवाटीकेजवळ पाण्याचा मुबलक साठा असावा म्हणजे विहीर, बोरवेल इत्यादी.
7. रोपवाटीकेच्या आजूबाजूस उंच झाडे नसावीत कारण झाडामुळे रोपवाटीकेतील रोपांना सुर्यप्रकाश मिळणार नाही
8. सर्वसाधारणपणे ,रोपवाटीकेतील वाफ्यांची लांबी ,रुदी ही त्या त्या पीकांवर अवलंबून असते जसे
 Gadiwaafa गादीवाफे तयार करणे :-

1.   एक भाग स्वच्छ काळी माती घेऊन ती काळ्या रंगाच्या मेनकापडावर २ ते २ .५ सें.मी .चा पातळ थर तयार होईल अशा रितीने पसरवावी .

2.   त्यावर पातळ पांढ-या रंगाचे मेनकापड पसरवावे .

3.   ती माती उन्हात तशीच दोन दिवस ठेवावी ,सुर्याची उष्णता मेनकापड शोषून घेते त्यामुळे मातीमध्ये असणारे सुक्ष्म जीवजंतू नष्ट होतात.

4.   एक भाग जंतू विरहीत माती ,एक भाग वाळू आणि एक भाग गांडूळ खत मिसळा.

5.   हे मिश्रण  मुळांच्या चांगल्या वाढीसाठी व रोपांची सहज उपटणी करण्यासाठी उपयोग आहे . त्यानंतर वाफ्यावर शेणखत / कंम्पोस्ट टाकून गादीवाफा सपाट करावा.

6.   गादीवाफ्याची उंची १५ सें .मी ठेवावी .

 

गादीवाफ्यावार पेरणी :

  • त्यानंतर झारिच्या साह्याने गादीवाफ्याला पाणी देऊन त्यावरू बी पेरावे.
  • दोन ओळीतील अंतर ८ – १० सें .मी ठेवून ,१ ते १ . ५ सें .मी खोलीवर बियाची पातळ पेरणी करून् बारीक मातीने बियाणे हलकेच झाकावे.
  • बियाण्याची उगवण होईपर्यत आवश्यकेनुसार सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे तदनंतर जरूरीप्रमाणे पाटाने पाणी द्यावे.
  • साधारणपणे भाजीपाल्याची रोपे ४ – ६ आठवड्यात लगवडीस तयार होतात.

sowing

 

 बीज प्रक्रिया :

  1. बीज प्रक्रिया करण्याकरिता १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम (३ टक्के) मीठ घालून एकत्रित करावे.
  2. घरचे किंवा घेतलेले बियाणे या मिश्रणात घालून हलविल्याने पाण्याच्या वर तरंगणारे पोचट तनाचे आणि रोगट बियाणे काढून टाकावे.
  3. तळाशी असलेले बियाणे स्वच्छ पाण्याने धुवावे. यानंतर ते बियाणे घरी असलेल्या सावलीत वाळवावे. या बियाण्यांना १ टक्के पारायुक्त (थॉयरम किंवा कॅप्टन औषध) चोळून बियाण्यांची गादी वाफ्यावर पेरणी करावी.
  4. गादी वाफ्यावर बियाण्यांची पेरणी केल्यास पाणी देणे सोपे जाते. झाऱ्यांनी पाणी दिले जाते. यात पेरणीचा लागत खर्च कमी लागतो.

Related posts

Shares