Search

भाताची चार सूत्री लागवड भाग – १

भाताची चार सूत्री लागवड भाग – १
[Total: 35    Average: 3.3/5]

कोकणातील व पश्चिम घट विभागातील शेतकऱ्यांस भातशेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल अशी पण साधी, कमी भांडवलाची आणि तरीसुद्धा अधिक उत्पादन देणारी सुधारित भातशेती पद्धतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन डॉ. नारायण कृ. सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षात संशोधन केले. ठिकठिकाणी शेतप्रयोग करून सुधारित चार सूत्री भातशेती पद्धती विकसित केली आहे.

चारसुत्री भातशेती पध्दतीत मुख्यत्वेकरुन पुढील व्यवस्थापन सुत्रांचा अंतर्भाव होतो.

1) भात पिकांच्या अवशेषांचा फेरवापर.

2) गिरीपुष्पचा हिरवळीचे खत म्हणून वापर.

3) रोपांची नियंत्रित लावणी.

4) लावणीनंतर त्याच दिवशी युरीया-डिएपी ब्रिकेटचा जमिनीत खोलवर वापर.

सूत्र एक :

भात पिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा फेरवापर : स्मार्ट डीलर स्पर्धा,३००० कॅश बॅक जिंकण्याची संधी

अ) भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळावी.

भाताच्या तुसाची राख (पूर्ण जळालेली पांढरी राख नव्हे) रोपवाटिकेमध्ये, गादीवाफ्यात भाताचे बी पेरण्यापूर्वी प्रति चौरस मीटर एक किलोग्रॅम या प्रमाणात चार ते सात सें.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर बीजप्रक्रिया केलेले भाताचे बी त्याच ओळीत पेरावे.

ब) भाताचा पेंढा लावणीपूर्वी शेतात गाडावा.

भाताचा पेंढा पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी अंदाजे दोन टन या प्रमाणात शेतात गाडावा.

फायदे  १) भात पिकांना सिलिका व पालाश यांचा पुरवठा होतो. (पालाश  २०-२५ किलोग्रॅम. सिलिका : १००-१२० किलोग्रॅम.)

२) रोपे निरोगी व कणखर होतात.

३) रोपांच्या अंगी खोडकिडा यांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

सूत्र दोन :

गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हिरवळीच्या खताचा वापर :

गिरिपुष्प हिरवळीचे खत (दोन ते चार गिरिपुष्पाच्या झाडांची हिरवी पाने किंवा अंदाजे ३० कि.ग्रॅ. / आर) चिखलणीपूर्वी सात ते आठ दिवस अगोदर पसरावीत व नंतर चिखलणी करून रोपांची लावणी करावी.

हिरवळीचे खत वापरण्याची सोपी पद्धत :

गिरिपुष्पाच्या फांद्या जमिनीपासून ३० ते ४० सें.मी. उंचीवर तोडाव्यात. त्याच झाडाच्या तोडलेल्या फांद्या चिखलणीपूर्वी सहा ते आठ दिवस अगोदर खाचरात पसराव्यात. आठवड्यात फांद्यांवरील पाने गळून पडतात. उरलेल्या फांद्या गोळा करून जळणासाठी इंधन म्हणून वापराव्यात. चिखलणी करून गळून पडलेली पाने चिखलात व्यवस्थित मिसळावीत, नंतर लावणी करावी.

फायदे : १) भातरोपांना सेंद्रिय – नत्र (हेक्‍टरी १० ते १५ किलोग्रॅम) वेळेवर मिळाल्यामुळे भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते. खाचरात सेंद्रिय                   पदार्थ मिळाल्यामुळे जमिनीची जडणघडण सुधारून उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते.

२) सेंद्रिय पदार्थ मर्यादित प्रमाणात गाडल्यामुळे भात खाचरांतून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाण  (म्हणजेच हवेचे प्रदूषण) कमी                      होते.

या लेखाच्या पुढील भागात आपण उर्वरित दोन सूत्रांची माहिती जाणून घेऊया.

तुमच्या विभागासाठी योग्य भाताचे सुधारित वाण कोणते?

जाणून घेण्यासाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:

 

Related posts

Shares