Search

भात लागवड

भात लागवड

buttons eng-minतांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. भात लागवडीच्या महत्वाच्या टप्प्यांवर नजर टाकूया.

पूर्वमशागत :

पहिल्या पिकाच्या कापणीनंतर योग्य वापसा येताच पहिली नांगरट करावी. पाऊस पडल्यावर पुन्हा आडवी नगरात करावी आणि दुसऱ्या नांगरटीद्वारे हेक्टरी ७.५ टन शेणखत किंवा कंपोस्ट एकसारखे मिसळावे. चिखलणीच्यावेळी हेक्टरी ५.० टन गिरिपुष्प हिरवळीचे खत शेतात मिसळावे. यामुळे ५० टक्के नत्र खताची बचत होऊ शकते.

रोपवाटीकेचे व्यवस्थापन :

प्रथम जमीन नागरून ढेकळे फोडावीत आणि हेक्टरी १० टन शेणखत जमिनीत मिसळावे. जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच निचऱ्याच्या जागी तळाशी १२० सें. मी. व पृष्ठभागी ९० सें. मी. उंचीचे उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादीवाफे तारार करावेत. वाफ्यांना प्रती आर क्षेत्रास १ कि. ग्रॅम युरिया व ३ कि. ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. प्रती कि. ग्रॅम बियाण्यास २.५ ग्रॅम प्रमाणे थायरम हे बुरशीनाशक चोळावे. वाफ्यावर रुंदीस समांतर ७ ते ८ सें. मी. अंतरावर ओळीमध्ये साधारण २.५ सें. मी. खोलीवर बी पेरावे आणि ते मातीने झाकून घ्यावे. जाड दाण्याच्या जातीकरिता हेक्टरी ५० ते ६० कि. ग्रॅम आणि बारीक दाण्याच्या जातीकरीता हेक्टरी ३५ ते ४० कि. ग्रॅम तर संकरीत जातींसाठी हेक्टरी २० कि. ग्रॅम बियाणे वापरावे. पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रती आर क्षेत्रास १ कि. ग्रॅम युरिया खताचा दुसरा हप्ता द्यावा. रोपवाटिकेमधील तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीनंतर वाफे ओले होतच आॅक्झॅडायारजील ( ६ ई. सी.) प्रती लिटर पाण्यात ३ मि. ली. याप्रमाणे प्रती आर क्षेत्रावर ५ लिटर या प्रमाणात एकसारखे फवारावे.

पुनर्लागण (लावणी) :

खरीप हंगामात १२ ते १५ सें.मी. उंचीची पाच ते सहा पाने फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार २० ते २७ दिवसांची रोपे लावणीसाठी वापरावीत. रब्बी हंगामात पेरणीनंतर सुमारे ३५ ते ४० दिवसांनी रोपे लावावीत. एस. आर. आय. पद्धतीच्या तत्वानुरुप आपल्या विभागात १५ दिवसाच्या रोपांची लावणी पाणी कमी साठणाऱ्या शेतात केल्यास पुनर्लागवड वेळेत आटोपते व उत्पादकतेत भरीव वाढ होते. रोपे उपटण्यापूर्वी दोन दिवस आधी पाणी द्यावे. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखलणी करावी. चिखलणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग सम पातळीत आणावा म्हणजे शेतात सर्वत्र पाण्याची पातळी सरत्खी ठेवता येते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी १५ X १५ सें. मी. किंवा २०X १५ सें. मी. अंतर ठेवून करावी. लावणी सरळ आणि उथळ (.५ ते ३.५ सें. मी. खोल) करावी. उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडात तीन रोपे लावावीत. संकरीत भातासाठी एका चुडात एक रोप लावावे.

संदर्भ : कोकण कृषी विद्यापीठ

Related posts

Shares