Search

साठवणीसाठी भुईमुगाची काढणी

साठवणीसाठी भुईमुगाची काढणी

बहुतांश शेतकरी भुईमुग काढणीच्या तयारीत असतील. भुईमुगाची काढणी व काढणी पश्चात हाताळणी योग्य प्रकारे करणे आवश्यक असते. अन्यथा भुईमुगाच्या गुणवत्तेवर, बियाण्याच्या उगवण क्षमतेवर विपरित परिणाम होतो. भुईमुगाची काढणीदरम्यान योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.अन्यथा बियाण्याची उगवण क्षमता कमी होऊ शकते.

उगवण क्षमता कमी होण्याची कारणे:

 • भुईमुगाची काढणी योग्य पक्वतेला न करणे.
 • भुईमुगाच्या शेंगा कडक उन्हात वाळवणे.
 • वाळविलेल्या शेंगातील ओलाव्याचे प्रमाण योग्य न राखणे.
 • साठवणूक गृहाचे तापमान व आर्द्रतेचे प्रमाण योग्य न राखणे.

बऱ्याच वेळा अधिक शेंगा पक्व झाल्यानंतर वेलीवरील पाने पिवळी पडू लागतात.पाने गळणे सुरू होते.पक्वता ओळखण्यासाठी वेल उपटून पाहिल्यास शेंगा टणक दिसतात, तर शेंगेचे टरपल आतून काळे पडल्याचे दिसून येत.दाणे त्यांच्या पूर्ण वाढलेल्या अवस्थेत तर दाण्यांचा रंग जातीनुसार (लालसर गुलाबी) बदललेला दिसून येतो. शेतात फिरून काही वेल तपासून पक्वता तपासता येते.त्यावरून काढणीची योग्य वेळ व अवस्था मिळवता येईल.साधारणपणे वेलीवरच्या 75 टक्के शेंगा पक्व झालेल्या आढळल्यास काढणी करावी.

भुईमूगाची काढणीमध्ये दोन महत्वाची कामे असतात.

1)भुईमुगाचे झाड उपटणे.
2)उपटलेल्या वेलीच्या शेंगा तोडणे.

 • काढणी करतेवेळी जमिनीत पुरेसा ओलावा किंवा वाफसा स्थिती असल्यास वेली शेंगासह उपटून काढणी करता येते.
 • मात्र, जमीन कडक झाली असल्यास बैल चलित किंवा ट्रॅक्ट रचलीत अवजारांचा वापर करता येतो.
 • त्यामध्ये पास किंवा भुईमूग काढणी यंत्र उपलब्ध आहेत.
 • शेंगा तोडण्यासाठी विविध वाणाप्रमाणे, ठिकठिकाणी विविध प्रकार अवलंबविले जातात.
 • उपट्या वाणांमध्ये उपटलेले वेल हिरवे असतांनाच शेंगा हाताच्या सहाय्याने तोडून किंवा पासेवर वेल आपटून वेलीपासून वेगळ्या केल्या जातात.
 • शेंगा वेगळ्या करण्यासाठी स्ट्रिपर्स उपलब्ध आहेत.
 • ते मजुरांकरवी किंवा यंत्राद्वारे चालतात.
 • पसरणाऱ्या वाणांमध्ये काढणी केलेले वेल वाळवून त्यापासून काठीच्या सहाय्याने ठोकून शेंगा वेगळ्या केल्या जातात.
 • उफणणी यंत्राने शेंगा वेगळ्या केल्या जातात.

भुईमूगाची उगवण क्षमता टिकविण्यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञान:

वाळवणी

 • काढणी करतेवेळी शेंगामध्ये 40-50 टक्के ओलावा (पाणी) असते.
 • काढणी केलेल्या शेंगा वाळवून त्यातील पाण्याचे प्रमाण (ओलावा) 10 टक्केपर्यंत कमी करावा.
 • शेंगा साठवणुकीसाठी सुरक्षित राहतात. उन्हात शेंगा वाळविणे ही चांगली व सोपी पद्धत आहे.
 • शेंगामध्ये बुरशी वाढू नये म्हणून शेंगा लवकर वाळवाव्यात.
 • मात्र उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा बियाण्यासाठी घेतल्या असतील,तर त्या उन्हात वाळवू नयेत, त्यामुळे बियाण्याची उगवण शक्ती कमी होते.

साठवण

 • भुईमुगाच्या शेंगाची साठवण ही त्या पीक उद्देशावर अवलंबून असते.
 • विक्रीसाठी असलेल्या शेंगा वाळविल्यानंतर लगेच काही दिवसांत विकून टाकल्या जातात किंवा चांगले दर मिळावे
  म्हणून शेतकरी सहा ते आठ महिने शेंगा साठवतात किंवा खरिपासाठी बियाणे म्हणून (खरीप ते खरीप) साठवण केली जाते.
 • साठवणुकीसाठी शेतकरी मातीच्या कोठ्या, लोखंडी कोठ्या, बांबू बास्केट, ज्यूट बॅग (पोते) यांचा प्रामुख्याने वापर करतात.

काढणी पश्चात चाऱ्याचे व्यवस्थापन

 • भुईमुगाचा पाला उत्तम चारा म्हणून गणला जातो.
 • भुईमुगाच्या पाल्याची पाचकता जवळजवळ 53 टक्के इतकी आहे.
 • तर त्यातील क्रूड प्रथिने 88 टक्के इतकी आहे.
 • 1 किलो पूर्ण वाळलेल्या चाऱ्यापासून 2327 कॅलरी उष्मा मिळते.
 • शेंगा तोडून झालेला पाल्याचे छोटे छोटे भेले वळले जातात.
 • असा वाळलेला पाला उन्हात वाळवून त्याची चाऱ्यासाठी साठवण केली जाते.
 • भुईमुगाचा पाला पावसात ओला झाल्यास त्यावर बुरशी वाढते.
 • तो जनावरांना खाण्यासाठी अयोग्य होतो म्हणून काढणी नंतर वाळलेला पाला त्वरित कोरड्या जागी शेडमध्ये हलवावा.
 • शेंगदाणा पेंड- पेंडीत 6 टक्के तेलाचे प्रमाण असून प्रथिनांनीही भरपूर असतात.
 • भारतात शेंगदाणा पेंड जनावरांना खाद्यात व सेंद्रिय खत म्हणून वापरले जाते.

ऍफलाटॉक्सिेन निर्मितीला अटकाव करण्यासाठी

 • काढणीनंतर शेंगातील दाण्यामध्ये ओलावा 9% पेक्षा जास्त असेल तर ऍरपराजिल्स फ्लेव्हस या बुरशीची वाढ होऊन ऍफलाटॉक्सिदन निर्मिती होते.
 • शेंगा खाण्यासाठी अयोग्य होतात.ऍफलाटॉक्सिफन होण्याच्या कारणामध्ये साठवण कालावधी वाढणे, शेंगाची वाळवण नीट न होणे, ही दोन महत्त्वाची कारणे आहेत.
 • जितका साठवण कालावधी वाढेल तितकी ऍफलाटॉक्सिंन निर्मितीची शक्यमता वाढते. साठवणीसाठी शेंगा व्यवस्थित वाळवून (ओलावा 10 टक्यांयऍ पेक्षा कमी) घ्याव्यात.
 • साठवणीची जागा कोरडी असावी.
 • खरीप हंगामातील शेंगाची काढणी ही पावसात सापडण्याची शक्यवता असते.
 • अशा शेंगा वाळविण्यामध्ये अडचणी येतात व शेंगा व्यवस्थित न वाळल्यामुळे ऍफलाटॉक्सितनची शक्याता जास्त असते.

भुईमुगाची गुणवत्ता तपासणीसाठी

  भुईमुगाच्या गुणवत्ता तपासणीमध्ये दाण्यातील तेलाचे प्रमाण, शेंगाचे वजन, शेलिंगची टक्केवारी, 100 दाणे वजन या घटकावर मोजली जाते.

 • तेलाचे प्रमाण – शेंगातील तेलाचे प्रमाण हे शेंगा वाढीच्या काळामधील तापमान, पाऊस, जमिनीतील ओलावा, दाण्याची पक्वता, जमिनीतील
  मुळांची कार्यक्षम कक्षेतील गंधकाचे प्रमाण यावर अवलंबून असते. साधारणपणे भुईमुगामध्ये 48 ते 51 टक्के तेलाचे प्रमाण असते.
 • शेंगाचे वजन – शेंगाचे वजन हे त्याच्या आकारमानावर अवलंबून असते. त्यासाठी शंभर दाण्याचे वजन करण्याची पद्धत अवलंबली जाते.
  उदा. 100 लहान शेंगाचे वजन हे मोठ्या शेंगाचे वजनापेक्षा कमी भरेल. शेंगाचे आकारमान व वजन हे समान पाऊसमान, जमिनीतील कॅल्शियम, गंधक यांच्यावर अवलंबून असते.

(तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव.)

Related posts

Shares