Search

भेंडी लागवडीचा मूलमंत्र नेमका काय आहे?

भेंडी लागवडीचा मूलमंत्र नेमका काय आहे?

महाराष्ट्रात दमदार पावसाच्या हजेरीने खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे.  यामुळे, सगळीकडे पेरणीची कामे पूर्णत्वास गेल्याचं समाधानकारक चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. महार्ष्ट्रातल्या शेतीचा विचार करायला गेलं, तर शेतीतील विविध पीके ठराविक भागात( बेल्ट मध्ये) घेतली जातात. जसं, कोकणात भाताचे पीक घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात विविध पिकांबरोबर विविध भाज्यांचेही उत्पादन घेतले जाते.

शेतीच्या विविध हंगामांमध्ये कोणते उप्तादन किंवा पीक केव्हा घ्याव्ये याचा कालावधी ठरलेला आहे. घरात स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला कोणती भाजी करावी याची चिंता नेहमीच भेडसावत असते. एकूणच तिला योग्य नियोजन करावे लागते. असेच नियोजन कोणत्याही पिकासाठी करावे लागते. भेंडीची भाजी  काही जणांच्या आवडीची तर काही जणांसाठी नावडती. असे असले तरी भेंडीला बाजारात चांगली मागणी आहे.

भेंडीचे पीक कधी, कुठे आणि कसे घ्यावे याबाबत आपण जाणून घेऊया.

खरीप  हंगामातील  जुलैच्या  पहिल्या  आठवडयात  आणि उन्हाळी हंगामात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड करावी.

लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून हेक्‍टरी 20 टन शेणखत मिसळावे.

लागवडीसाठी फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय या जातींची निवड करावी.

लागवडीसाठी हेक्‍टरी 15 किलो बियाणे लागते.

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 25 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.

लागवड 30 सें.मी. बाय 15 सें.मी. अंतराने करावी.

या पिकाला माती परीक्षणानुसार लागवडीच्या वेळी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश ही खत मात्रा द्यावी. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्राची मात्रा द्यावी.

दर 15 दिवसांनी खुरपणी करावी.

अशाप्रकारे जर योग्य नियोजन केले तर भेंडीचे उत्पादन खऱ्या अर्थाने फायद्याचे ठरू शकते.

 

Related posts

Shares