Search

मत्स्य पालन – अनुदान

मत्स्य पालन – अनुदान

buttons eng-min

मासे हे सर्वसामान्यांना परवडणारे आणि दर्जेदार प्रथिनांचा समावेश असलेले अन्न आहे. आपल्या गावातील एखादे तळे, शेत तळे, भात शेत किंवा पाण्याची उपलब्धता असलेल्या एखाद्या ठिकाणी मत्स्य शेती करणे शक्य आहे. यामुळे कुशल तसेच अकुशल तरुणांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या व्यवसायातून मिळणारा नफा लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकापेक्षा अनेक जातीच्या माशांचे एकत्रपणे पालन केले जाते. याला ‘संमिश्र मत्स्य शेती’ म्हटले जाते. साधारणतः २ मीटर पेक्षा अधिक पाण्याची पातळी असलेल्या जागी किंवा कमीत कमी एक मीटर पाण्याची पातळी असलेल्या जागीही ‘मत्स्य शेती’ करणे शक्य आहे. याचबरोबर हंगामी तलावांमध्ये कमी कालावधीत करता येणारी मत्स्य शेती करता येऊ शकते.
अनुदान :
नवीन तलावाची निर्मिती करणे, तलाव विकसित करणे, पहिल्या वर्षी मत्स्य बीज खरेदी करणे यासारख्या विविध कामांसाठी अनुदान दिले जाते. हे अनुदान विविध स्तरावर दिले जाते. हे अनुदान राज्यसरकारच्या मत्स्य विभागातर्फे दिले जाते.
अनुदान कोणाला मिळू शकते?
१. अनुदान व्यक्तिशः दिले जाऊ शकते.
२. एखाद्या कंपनीला अनुदान दिले जाऊ शकते.
३. भागीदारी संस्था
४. सह. संस्थांना अनुदान मिळू शकते.
५. मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा समूह.

‘FFDA’ तर्फे मत्स्य पालनाविषयी अनुदान पात्र उमेदवारांना मार्गदर्शन केले जाते. मात्र, या उमेदवारांना कर्ज घेण्यापूर्वी मत्स्य शेतीविषयीचा अनुभव असणे गरजेचे आहे.
कर्जाची परतफेड:
कर्जाची परतफेड ६ ते ८ वर्षाच्या कालावधीत वार्षिक हफ्त्याच्या स्वरूपात करता येऊ शकते.
व्याजदर :
RBI आणि NABARD यांच्या मार्गदर्शक तत्वानुसारच कर्जावरील व्याजदर निश्चित केला जातो.
सुरक्षा ठेव:
RBI च्या मार्गदर्शक तत्वानुसार अंतिम लाभधारकाकडून सुरक्षा ठेव घेतली जाते.

Ref : http://farmextensionmanager.com/

Related posts

Shares