Search

मधमाशीचे प्रकार

मधमाशीचे प्रकार

मधमाशीच्या विविध प्रकारांची माहिती घ्या!

मिक्रॅपिस

 • एपिस फ्लोरिया आणि एपिस अँ ड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाशांच्या जाति एपिस प्रजातीच्या मिक्रॅपिस या उपप्रजातीमधील आहेत.
 • या मधमाशा लहान उघडे पोळे झुडुपावर तयार करतात.
 • त्यांची नांगी लहान आकाराची आणि त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही.
 • त्यांचे पोळे संरक्षणाची फार काळजी न करता हाताळता येते.
 • या दोन्ही जाती परस्परापासून भिन्न दिसत असल्या तरी त्यांचा उगम एकाच पूर्वज जातीपासून झालेला आहे (sympatrically).
 • मूळ पूर्वज जाति भौगोलिक कारणाने भिन्न झाल्यानंतर त्यांच्या दोन जाति झाल्या असाव्यात (allopatric speciation).
 • त्यानंतर त्यांचा विस्तार झाला. एपिस फ्लोरिया विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेली आहे. तर एपिस अँोड्रेनिफॉर्मिस अधिक हल्लेखोर आहे.
 • एपिस फ्लोरियापासून अधिक मध मिळवला जातो. एपिस फ्लोरियाची वंशावळ चाळीस लाख वर्षांची असल्याचे सिद्ध झाले आहे.

मेगापिस

 • उपप्रजाती मेगापिस मध्ये फक्त एका जातीची नोंद आहे.
 • उंच झाडावर, कड्यावर, किंवा उंच इमारतीवर एक किंवा अनेक पोळी बांधणारी ही जात अत्यंत आक्रमक आहे.
 • यांच्या पोळ्यामधील मध अधून मधून माणूस काढण्याचा प्रयत्न करतो.
 • उत्तेजित झाल्यानंतर माणसावर केलेल्या हल्ल्याने माणूस अधमाशांच्या दंशाने मृत्युमुखी पडतो.
 • एपिस डॉर्साटा आकाराने ही मधमाशी सर्वात मोठी आहे.
 • दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये सर्वत्र पसरलेली आहे.
 • एपिस डॉर्साटा बिंघॅमी: इंडोनेशियन मधमाशी.
 • एपिस डॉर्साटाची उपजाती किंवा वेगळी जाति असल्याची शक्यता.
 • एपिस डॉर्साटा ब्रेव्हिलिग्युला यास वेगळ्या जातीचा दर्जा आहे.
 • एपिस डॉर्साटा लॅबोरिओसा : हिमालयातील मधमाशी. काहीं वर्षापूर्वी या मधमाशीला वेगळ्या जातीचा दर्जा मिळाला आहे.
 • या मधमाशीचे वास्तव्य हिमालयातच आहे.
 • एपिस डॉर्साटापासून थोडी भिन्न असून या मधमाशीच्या वर्तनामध्ये विविध स्वरूपाचे परिवर्तन झाले आहे.
 • त्यामुळे अति दुर्गम आणि समुद्रसपाटीपासून उंचावर पोळे बांधू शकतात.ही मधमाशी आकाराने सर्वात मोठी आहे.

एपिस

 • या प्रजातीमध्ये तीन-चार जाति आहेत.
 • बोर्निओमधील एपिस कोशेव्निकोव्ही ही इतर मधमाशापासून वेगळी आहे.
 • गुहेमध्ये राहणाऱ्या मूळ मधमाशापासून याची उत्पत्ति झाली.
 • पूर्वेकडे एपिस सेराना ही दक्षिण आणि पूर्व आशियामधील मूळ मधमाशी.
 • एपिस मॅलिफेरा प्रमाणे लहान आकाराची ही मधमाशी पोळ्यामध्ये सांभाळली जाते.
 • बोर्निओमधील एपिस सेराना न्युलुएंसिस आणि एपिस निग्रोसिंक्टा या फिलिपाइन्स मधील मधमाशाबरोबर याचा नेमका संबंध अजून प्रस्थापित व्हायचा आहे.
 • नव्या संशोधनानुसार या वेगळ्या जाति आहेत.
 • एपिस सेराना याचा उगम एका जातिपासून झाला नसल्याची शक्यता आहे.

एपिस मॅलिफेरा

 • एपिस मॅलिफेरा ही मधमाशांची जात आता पाळीव झाली आहे.
 • या मधमाशीच्या जनुकीय आराखड्याचा पूर्ण अभ्यास झाला आहे.
 • उष्ण पूर्व आफ्रिकेमध्ये याची उत्पत्ति झाली.
 • उत्तर युरोप आणि पूर्वेकडे आशिया मधून चीनमध्ये ती पसरली.
 • या मधमाशीस युरोपियन, पश्चिमेकडील किंवा कॉमन मधमाशी जगाच्या विविध भागात म्ह्णण्यात येते.
 • या मधमाशीच्या अनेक उपजाति आहेत. त्या स्थानिक भौगोलिक आणि हवामानाप्रमाणे बदलल्या आहेत.
 • यापासून बकफास्ट बी नावाची संकरित मधमाशी तयार केलेली आहे.स्थानपरत्वे वर्तन, रंग आणि शरीररचना यामध्ये उपजातीमध्ये बदल झालेला आहे.
 • एपिस मधमाशीचा उगम थोडा अनिश्चित असला तरी मायोसीन काळाच्या शेवटी मूळ मधमाशीपासून ही जाति वेगळी झाली.
 • हा सिद्धांत गुहेमधील मधमाशांच्या पूर्व आफ्रिकेमधील आणि पूर्व आशिया या दोन्हीमधील वाळवंटीकरणाचा परिणाम आहे असे समजले जाते.
 • वाळवंटीकरणामुळे वृक्ष नाहिसे झाले, पोळे बांधण्यासाठी आवश्यक झाडे नाहिशी झाल्याने दोन्ही वेगळ्या झालेल्या समूहामधील जनुक संक्रमण थांबले.
 • शेवटच्या हिमयुगाचा आणि प्रारंभीच्या प्लाइस्टोसीन काळातील हा परिणाम आहे.
 • हजारो वर्षापासून केलेल्या मधमाशी पालनामुळे पश्चिम युरोपियन मधमाशीमध्ये उत्क्रांतीचा वेग वाढला.
 • अमेरिकेमध्ये एकही मुळची मधमाशी नाही. 1622 मध्ये युरोपियन वसाहतीबरोबर एपिस मेलिया मॅलिफेरा ही गडद रंगाची मधमाशी अमेरिकेत आणली.
 • या पाठोपाठ इटलीमधून एपिस मेलिया लिग्युस्टिका आणि इतर मधमाशा आणल्या गेल्या. वसाहतीबरोबर मधमाशीवर अवलंबून असलेली पिके लावली गेली.
 • सध्या अमेरिकेत वन्य मधमाशा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधमाशा कॉलनीमधील बाहेर पडलेल्या मधमाशा आहेत.
 • गवताळ मैदानात त्या मोठ्या वेगाने वसाहतीबरोबर पसरल्या. कित्येक वर्षे रॉकी पर्वत ओलांडणे त्याना शक्य झाले नव्हते.
 • 1950 च्या सुमारास मधमाशा जहाजातून कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाल्या.

आफ्रिकन मधमाशी

 • आफ्रिकन मधमाशाना किलर बी असे नाव आहे.
 • युरोपियन मधमाशा आणि आफ्रिकेतील एपिस मेलिफेरा स्कुटेलाटा यांच्या संकरातून या मधमाशीची उत्पत्ति झाली.
 • स्वभावत: या चिडखोर आणि कधीही हल्ला करण्याच्या स्थितीमध्ये असतात. सहसा या रोगाना बळी पडत नाहीत.
 • अपघाताने ब्राझीलमध्ये यांचा उगम झाला. उत्तर अमेरिकेत त्या पसरल्या.
 • त्यांचा उद्रेक एवढा भयंकर होता की काहीं ठिकाणी त्या त्रासदायक ठरल्या.
 • थंडीस त्या फारसा प्रतिकार करू शकत नसल्याने शीत प्रदेशात त्या टिकाव धरू शकल्या नाहीत.
 • त्या उत्तम मध गोळा करतात. त्यामुळे ब्राझील मधील मधुमक्षिका पालनासाठी त्या उत्तम आहेत.

Related posts

Shares