Search

मल्चिंग पेपर वापराचा मूलमंत्र

मल्चिंग पेपर वापराचा मूलमंत्र
[Total: 19    Average: 3.2/5]

मल्चिंग पेपरचा वापर आता बहुतांश भागातील शेतकरी करू लागले आहेत. मात्र मल्चिंग पेपर चा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी. मल्चिंग पेपर वापरताना पाण्याचे नियोजन कसे करावे? यासारख्या विविध पैलूंबाबबत जाणून घेणे गरजेचे आहे. मल्चिंग पेपर वापराचा मूलमंत्र या लेखात आपण अशाच महत्वपूर्ण माहितीचा आढावा घेऊया.

मल्चिंग पेपर वापरण्याची पद्धत :

 • ज्या ठिकाणी वापरावयाचे त्या ठिकाणी पीकवाढीच्या पूर्ण ‘फ्लोरा’ किंवा पानांचा घेरा आहे, तिथपर्यंत वापरणे आवश्यक आहे.
 • जेवढा आवश्यक आहे तेवढा पेपर कापून घ्यावा
 • जिथे वापरायचा त्या ठिकाणी माती, दगड आदी घटक काढून स्वच्छ बेड तयार करून घ्यावा.
 • आच्छादनापूर्वी बेड पूर्ण ओला करावा व वाफशावर पेपर अंथरावा. ज्यामुळे हवा व इतर घटक त्यात जाणार नाहीत व बाष्पीभवन रोखले जाईल.
 • पीक लागवड अंतरानुसार पेपरचे अंतर ठरविले जाते.

फिल्म वापरताना घ्यायची काळजी :

 • पेपर जास्त ताणू नये तो ढिला सोडावा.
 • जास्त तापमान असताना शक्यतो पेपर अंथरु नये. शक्यतो ऊन कमी असताना वापरावा.
 • पाणी देण्याची पद्धत :
 • मल्चिंग पेपर वापर करण्यापूर्वी पेपर खालून ठिबक सिंचनाच्या नाल्या टाकाव्या. शक्यतो भाजीपाला पिकांमध्ये ठिबक सिंचन करणे आवश्यक आहे.
 • तुषार सिंचनाचा वापर करून भुईमूग सारख्या पिकात वापर करू शकता. भुईमूगारसंख्या पिकात मोकाट सिंचनसुद्धा करू शकता.

मल्चिंग पेपरचे फायदे :

 • हे पूर्णतः आत किंवा बाहेर जाऊ देत नाही.
 • बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते.
 • बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते.
 • खतांच्या वापरात बचत होते. कारण पाण्यात वाहून जाण्याचे खतांचे प्रमाण कमी होते.
 • जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो.
 • वार्षिक ताणाच्या वाढीस प्रतिकार होतो. कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही.
 • प्लॅस्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी-रोग दूर जातात. त्यांचे प्रमाण कमी होते.
 • जमिनीचे तापमान वाढते. जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
 • आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक असते.

लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक होते.

 • पेपरखालील जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात. उगवण २-३ दिवस लवकर होते.
 • भुईमुगासारख्या पिकात मुलांवरील गाठींचे प्रमाण वाढते.
 • सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते. पावसाच्या थेंबामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.

शेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा!

तुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा

तुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...

धन्यवाद!  तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.

Related posts

Shares