Search

मल्चिंग भात शेती तंत्रज्ञान

मल्चिंग भात शेती तंत्रज्ञान
[Total: 33    Average: 3.2/5]

शेतामध्ये करण्यात येणारे यशस्वी प्रयोगच कालांतराने “आधुनिक तंत्रज्ञान” म्हणून ओळखले जाते. मल्चिंग पेपरच्या वापराने करण्यात येणारी भात  शेती हि शेतकरी बांधवांसाठी खूप फायद्याची ठरू शकते. मल्चिंग भात शेती तंत्रज्ञानामुळे लागणारा वेळ, मजुरांची अनुपलब्धता आणि दिवसागणिक वाढत जाणारा खर्च यांसारख्या समस्यांवर निश्चित तोडगा निघू शकतो. या तंत्रज्ञानाच्या अवलंबाने केवळ खर्चात कपात होत नाही तर कमी वेळात दर्जेदार उत्पादन आल्याने चांगला नफा मिळतो.

मल्चिंग भात शेती तंत्रज्ञान

 • नांगरणी आणि कुळवणी केल्यानंतर गादीवाफे तयार करावेत.
 • ४.५ फुटांवर सरी खणून घ्याव्यात.
 • गादीवाफ्यांची रुंदी ३ फुटांपर्यंत ठेवावी.
 • दोन गादीवाफ्यांमधील अंतर १.५ फूट ठेवावे.
 • यानंतर गादीवाफ्यांवर मल्चिंग पेपर अंथरावा.
 • पाऊस झाल्यानंतर मल्चिंग पेपर वर १ X १ फुटावर साधारण २ इंचाची छिद्र पाडावीत.
 • मातीमध्ये अपेक्षित ओलावा निर्माण झाल्यानंतर प्रत्येक छिद्रात ४–५ बियाणे टाकावीत.
 • बियाण्याची लागवड केल्यानंतर १५ दिवसात युरियाचा हफ्ता द्यावा.
 • दोन गादीवाफ्यांच्या मध्ये छोटी छिद्रे करून युरिया ब्रिकेट्स टाकावे.
 • एक एकरसाठी साधारण ६५ किलो युरिया लागू शकतो.
 • “कर्जत – ३” हि भाताची जात साधारणपणे ११०–१२० दिवसात तयार होते.

मल्चिंग भात शेती तज्ञांचा मोबाईल नंबर मिळवा!

तुम्हाला मल्चिंग पेपर च्या साहाय्याने भाताची शेती करण्याबाबत काही शंका असल्यास कृषितज्ञ श्री. भरत कुशारे (कृषितज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र, पालघर) यांना थेट संपर्क करू शकता.

रब्बी पीक (चणे लागवड)

 • खरिपातील भाताची काढणी झाल्यानंतर ऑक्टोम्बर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चणे लागवड करता येणे शक्य आहे.
 • लागवड करताना युरिया साठी तयार केलेल्या छीद्रांमध्ये १ ते २ चण्याची बियाणे टाकावीत.

मल्चिंग भातशेती महत्वाचे पैलू

 • चण्याची काढणी झाल्यानंतर, खरिफतील भाताची लागवड करता येऊ शकते.
 • महत्वाचे म्हणजे तयार गादीवाफ्यांवर भाताची लागवड शक्य आहे. एकाच गादीवाफ्यावर सलग चार वेळा पीक घेणे शक्य आहे.
 • गादीवाफ्यांवर पसरलेला मल्चिंग पेपर तीन वर्षे वापरता येऊ शकतो.
 • याचाच अर्थ सलग चार वर्षे गादीवाफे तयार करणे, मल्चिंग आणि कामगारांवर होणाऱ्या खर्चात निश्चित कपात होऊ शकते.

मल्चिंग चे फायदे

 • बियाणे कमी लागते.
 • जमिनीची धूप कमी होते.
 • मल्चिंग च्या वापरामुळे चिखलणी, रोप वाटिका तसेच लावणी व आंतरमशागतीचा खर्च कमी होतो.
 • मशागत आणि गादीवाफे तयार करण्याचा खर्च एकदाच होतो. दोन वर्षांपर्यंत मशागतीचा खर्च टाळता येतो.
 • पाणी मर्यादित लागते.
 • कीटक आणि रोगांपासून पिकाचा बचाव होतो.
 • गादीवाफ्यांवर तण उगवत नाहीत.
 • दर्जेदार आणि अतिरिक्त उत्पादन शक्य होते.
 • उत्पादनात १.५ ते २ पट वाढ होते.
 • एकाच गादीवाफ्यावर तीन वेळा पीक घेणे शक्य.
 • जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने रब्बीत चण्याचे चांगले उत्पादन येते.

शेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा!

तुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा

तुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...

धन्यवाद!  तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.

Related posts

Shares