Search

महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर

महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर
[Total: 0    Average: 0/5]

buttons eng-min

कधी पाऊस येईल आणि शेतीच्या कामांना वेग येईल या आशेने आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची प्रतीक्षा अधिक वाढली आहे. कारण पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून पूर्व पावसामुळे बळीराजाच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकण विभागात मान्सून साधारण १० जून पर्यंत दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आता मान्सून काहीसा लांबला आहे. साधारणपणे १७ जून पर्यंत मान्सून राज्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सूनसाठी आता साधारण आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मान्सून लांबणीवर पडल्यामुळे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देखील तापमान उच्चांक गाठत आहे. नागपूर आणि विदर्भात तापमान ४० अंशाच्या वर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आकाशात दाटलेले ढग आणि वाढलेले तापमान यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. कोकण किनारपट्टीसह मुंबईत शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावून अशा पल्लवित केल्या आहेत. मात्र दक्षिण गोव्यात अडकून पडलेला मान्सून १७ तारखे पर्यंत पुढे सरकून, पुढील २ ते ३ दिवसात नागपुरात सक्रिय होणार आहे.

दरम्यान, संपूर्ण पश्चिम किनारपट्टीत मान्सून जोमात बरसतो आहे. याअंतर्गत केरळ आणि कर्नाटकासह गोव्यातही मान्सून च्या सारी बरसात आहेत. गेल्या २४ तासात गोव्यात सरासरी ३५ ते ४० मि. मी पावसाची नोंद झाली आहे.

आता दक्षिण पश्चिम मान्सून कोकण आणि गोव्याचा बहुतांश भाग व्यापून टाकण्याची चिन्ह आहेत. असे असले तरी संपूर्ण भारतात मान्सून काहीसा लांबला आहे. पुढील रविवारपर्यंत विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, तोपर्यंत वातावरणात फार बदल होण्याची शक्यता नसल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

साधारणपणे पाहायला गेल तर विदर्भात मान्सून दाखल होण्याची तारीख हि १० जून आहे मात्र इथे मान्सून नेहमीच लांबणीवर पडल्याचं पाहायला मिळत. मागील ११ वर्षांपासून दरवर्षीच मान्सून लांबणीवर पडत आला आहे. ११ वर्षात केवळ तीन वर्षी मान्सून १५ जून रोजीच दाखल झाला आहे. तर उर्वरित वर्षी मान्सून दाखल होण्याचा कालावधी १५ जूननंतर नोंदला गेला आहे. २००५ ते २००७ अशी सलग तीन वर्ष मान्सून २४ जूनला धडकला होता. तर २००९ मान्सून २६ जून पर्यंत लांबला होता. मान्सून लांबणीवर पाडण्यासाठी अनेक वातावरणीय बदल कारणीभूत ठरत असतात.

लवकरच पाऊस येईल आणि बलीराजासः सगळ्यांच्या चिंता दूर होतील अशी अशा बाळगूया.

Related posts

Shares