Search

मागील वर्षातील शेतीचा मागोवा!!!!

मागील वर्षातील शेतीचा मागोवा!!!!

लहरी हवामानामुळे २०१४-१५ साली शेतकऱ्यांची कसोटी पाहिली. खरीप हंगामात वेळेवर पाऊस आला नाही व नंतर आलेल्या सतत पावसामुळे खरीप हंगाम जवळ पास वाया गेला. नंतर सुद्धा रब्बीच्या आशेवर आमचा शेतकरी बांधव जोमाने कामाला लागला पण लहरी निसर्गापुढे रब्बीचा हंगाम सुद्धा अवकाळी पाऊस, गारपीट आणि ढगाळ हवामानाचा फटका बसला. वर्ष संपता संपता जानेवारी-फेब्रुवारी-मार्च प्रत्येक महिन्यात अवकाळी  पावसाने कुठे गारपिटीने रबी मधील गहू, हरभरा, द्राक्ष, डाळींब, केळी, संत्री, आंबा या पिकांचे खूप नुकसान झाले आणि त्यामुळेच शेतकरी राजा हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळाला.

शेती नुकसान पंचनामे, सरसकट मदत, कर्जे माफ, खरीप Package, रबी Package इत्यादी घोषणांचा पाऊस सरकार तर्फे परत पाडला गेला. परंतु, या सर्व गोष्टींचा शेतकरी मनावर झालेला परिणाम अत्यंत गंभीर असून शेती न करण्यासाठी त्याला सर्व गोष्टी प्रवृत्त करीत असल्याचे दिसून आले.

ह्या सर्व प्रतिकूल परिस्थिती मध्येही आपल्याला बळीराजाला साथ द्यायची आहे. त्याला सावरायचे आहे. मदत तर होईलच, पण मानसिक बळ आपल्या सर्वाना द्यायचे आहे.

येणाऱ्या पुढील वर्षाच्या नियोजनासाठी त्याला पाठबळ देण्याची गरज आहे. तातडीने उपाय योजनांची अंमल बजावणी करणे गरजेचे आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजना, हवामान आधारित विमा योजना तसेच योग्य मार्गदर्शन देऊन बळीराजाच्या पाठीशी उभे राहून यशाची उंच गुढी उभारूया.

 

देस्ता ग्लोबल तर्फे सर्व शेतकरी बांधवाना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेछा !!!!

Related posts

Shares