Search

मान्सून अंदमानात दाखल

मान्सून अंदमानात दाखल
[Total: 0    Average: 0/5]

buttons eng-minसध्या सगळीकडे सर्वाधिक वाट पहिली जातेय ती मान्सूनची…दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाऊस कधी पडेल याची प्रतीक्षा आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली होती, असे झाल्यास भारतीय कृषी क्षेत्राला याचा फायदा होईल अशी अशा वर्तविली गेली होती.

अंदमानात मान्सूनची हजेरी मनाला दिलासा देते कारण मान्सून अंदमानात दाखल झाला कि मग तो हळूहळू केरळ मार्गे महाराष्ट्रात आगमन करतो. बुधवारी मान्सूनने अंदमानात हजेरी लावली आहे. यानंतर आता मान्सून बंगाल उपसागराच्या दक्षिण भागात दाखल होण्याची शक्यता वर्तविली आहे. यानंतर मान्सून पुढे आगेकूच करेल मात्र, यासाठी अनुकूल परिस्थिती असणे आवश्यक आहे. कारण, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि संभावित चक्रीवादळ यामुळे मान्सूनची पुढील वाटचाल काहीशी धीमी होईल असे भाकीत केले जात आहे.

मे च्या शेवटच्या आठवड्यात अंदमानात दाखल होणारा मान्सून यंदा १६ मे रोजीच अंदमानात आला आहे. जर हवामान योग्य राहिले तर मान्सूनची वाटचाल वेगवान राहील. मात्र, चक्रीवादळामुळे मान्सून सात जूनपर्यंत केरळात सक्रिय होईल. हे लक्षात घेत महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यास काहीसा विलंब लागण्याची शक्यता आहे हवामान खात्याने व्यक्त केली आहे. केरळात सक्रिय झाल्यानंतर बहुप्रतीक्षित मान्सून महाराष्ट्रात कधी सक्रिय होणार हे महत्वाचे आहे.

Related posts

Shares