Search

मान्सून लवकरच महाराष्ट्रात हजेरी लावणार

मान्सून लवकरच महाराष्ट्रात हजेरी लावणार
[Total: 0    Average: 0/5]

buttons eng-min

सलग दोन वर्षे दुष्काळानंतर यंदा बक्कळ पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आल्याने सगळेच ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो मान्सून भारतात डेरेदाखल झाला आहे. भारत आगमनात मान्सून ने पहिली हजेरी केरळात लावली आहे. आता येत्या तीन ते चार दिवसात मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दमदार हजेरी लावेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) केरळ आणि तामिळनाडूचा बहुतांशी भाग आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकच्या काही भागापर्यंत मान्सून ने हजेरी लावली आहे. दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग मालदीव, कोमोरिन, दक्षिण बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग मान्सून ने पूर्णपणे व्यापला असून, मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दक्षिण भारतात मान्सूनची वाटचाल वेगाने होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनच्या प्रगतीचा वेग पाहता पुढील चार ते पाच दिवसात मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दाखल होईल, मात्र विदर्भात मान्सून दाखल होण्यास काही वेळ लागेल. कारण मान्सूनची उत्तरेकडील वाटचाल अनुकूल वातावरणीय स्थिती निर्माण होण्यावर अवलंबून आहे.

मान्सूनची प्रगती अभ्यासण्यासाठी केरळमधील हवामान केंद्रांमध्ये निरीक्षणे नोंदवली जात आहेत. एखद्या राज्यातील किमान ६० टक्के हवामान केंद्रांवर सलग २४ तासात अडीच मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास तिथे मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले जाते. याव्यतिरिक्त मौसमी वाऱ्याचा प्रवाह इत्यादी गोष्टींचाही अभ्यास केला जातो. या सगळ्या घटकांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर मान्सून दाखल झाल्याचे सांगितले आहे. मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण स्थिती असल्याने शुक्रवारी सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये संपूर्ण केरळ, तामिळनाडू, मध्य समुद्राचा काही भाग आणि आंध्र प्रदेशाच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची प्रगती वेगाने होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचे चित्र आहे. केरळनंतर मान्सून वेगाने पुढे सरकत तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

Related posts

Shares