Search

मिरची लागवड

मिरची लागवड
[Total: 162    Average: 3/5]

भाजीपाला पिकांमध्ये मिरची हे नगदी पीक आहे. बाजारात वर्षभर हिरव्या मिरचीला मागणी असते. आपल्या दरर्जच्या आहारात मिरची हा अविभाज्य घटक आहे. मिरचीमध्ये विविध औषधी गुणधर्म देखील आढळतात. ‘अ ‘, ‘ब’, ‘क’ आणि ‘इ’ जीवनसत्व असलेली मिरची रक्तवर्धक आणि कृमीनाशक आहे. मिरची लागवड कशी करावी जाणून घेऊया.

हवामान आणि जमीन

मिरचीला उष्ण हवामान मानवते. बियांची उगवण १८.३ अंश ते २६.७ अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. झाडाच्या वाढीला २० अंश ते २५ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल आहे.

उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या माध्यम ते भारी हमीनीत मिरचीचे पीक चांगले येते. हलक्या जमिनीतही पुरेसे खत दिल्यास पीक चांगले येऊ शकते. साधारणतः माध्यम भारी ओल  ठेवणाऱ्या जमिनीत हे कोरडवाहू पिक म्हणून घेता येते. अतिआम्ल व अल्कलीयुक्त जमीन मिरचीच्या पिकास योग्य ठरत नाही.

लागवड व हंगाम

मिरचीची लागवड वर्षभर करता येते. खरिपाची बियांची पेरणी मी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून – जुलैपर्यंत करतात. रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी – फेब्रुवारी मध्ये बी पेरतात.

पेरणीसाठी जमीन खोल नांगरून घ्यावी. त्यानंतर उभ्या आडव्या कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. मिरचीच्या एक हेक्टर लागवडीसाठी रोप तयार करण्यासाठी १ किलो बी लागते.

खत व्यवस्थापन

मिरची पिकासाठी २० ते ४० गाड्या कुजलेले शेणखत मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. कोरडवाहू पिकासाठी ८० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावा. नत्राची मात्रा दोन हफ्त्यात द्यावी. पहिला  फुले येण्याच्या सुरुवातीला व दुसरा हफ्ता त्यानंतर तीन आठवड्यांनी द्यावा.  बागायती पिकासाठी हेक्टरी १०० किलो नत्र ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावा. संपूर्ण स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपाच्या लागवडीच्या वेळी द्यावी. नत्राची उर्वरित मात्रा लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यावी.

आंतरमशागत

खुरपणी करून तण काढावे व जमिनीत हवा खेळती ठेवावी. फुले येण्याच्या कालावधीत उभी – आडवी कोळपणी करून पिकाला भर द्यावी. ताणाच्या बंदोबस्तासाठी २ लिटर बासालीन ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे तणनाशक लागवडीपूर्वी वापरावे. तणनाशकामुळे ४५ ते ६० दिवसांपर्यंत तणाचे नियंत्रण होते.

संजीवकाचा वापर

मिरचीमध्ये नैसर्गिकरित्या फुलांची गळ होते. फक्त ३० ते ४० टक्के फुले झाडावर राहून त्यापासून फळे मिळतात. ढगाळ वातावरणात फुलांची गळ जास्त प्रमाणात होते. हे टाळून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी २५ ते ५० पी. पी. एम. एन. ए. ए. फवारणी करावी. किंवा २० मि. ली. प्लॅनोफीक्स १०० ली. पाण्यात पीक फुलोऱ्यावर असताना द्यावे.

रोग व किडी

रोग : बोकड्या

किडी : फळे पोखरणारी अळी

काढणी

भाजीसाठी पूर्ण वाढलेल्या पण हिरव्या मिरच्यांची काढणी करतात. तर वाळलेल्या मिरच्यांसाठी, पूर्ण पिकून त्या लाल रंगाच्या झाल्यावरच तोडणी करावी. मिरचीची फळे झाडावर जास्त काळ ठेवल्यास ती पिकतात. फळे झाडावरून देठासहित काढावीत.

उत्पादन

हिरव्या मिरचीचे सरासरी उत्पादन हेक्टरी १५ ते २० टनापर्यंत येते. वाळलेल्या मिरचीचे उत्पन्न २ ते ४ टन, तर कोरडवाहू मिरचीचे उत्पन्न ६ ते ७ क्विंटल येते.

 

Related posts

Shares