Search

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग १

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग १


भारताला “कन्ट्री ऑफ स्पाईसेस (मसाल्यांचा देश)” म्हणुन संबोधले जाते व मिरची हे मसाल्यामधील सर्वात महत्वाचे पिक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मिरची उत्पादनात भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. भारतात सर्वच ठिकाणी मिरचीची लागवड तिनही हंगामात केली जाते. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखट चव प्राप्त होते.या तिखटपणामुळेच मिरचीला बारामाही मागणी असते.

 हवामान व जमिन:

 • महाराष्ट्रात ऋतू नुसार तीन वेळा मिरचीचे पीक घेतले जाते.
 • ३० अंश सेल्सियस मध्ये मिरची चांगली येते.
 • ३० च्या वर १० च्या खाली तापमान गेल्यास वाढ खुंटते ऊन वाढल्यास मिरच्यांची गळही होते.
 • मिरचीला लाल, पोयट्याची, रेताड माती चांगली मानवते जमिनीत चून खडीचे प्रमाण असले तरी मिरचीचे पीक येते.
 • पाण्याचा निचरा होणारी भारी काळी जमीन मिरचीच्या पिकासाठी उत्तम समजली जाते.

रोपांसाठी गादीवाफे तयार करणे:

 • हराळी,लव्हाळा तसेच इतर तणे असलेली जमिन रोपे तयार करण्यासाठी निवडु नये.
 • जमिनीची खोल नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्या.
 • जमिनीच्या उतारानुसार 3 x 1 मीटरचे गादी वाफे तयार करावेत.
 • तसेच 10 ते 12 किलो चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
 • पेरणीपूर्वी गादी वाफ्यात 30 ग्रॅम ब्लायटॉक्‍स जमिनीत मिसळावे;

maxresdefault

मिरचीच्या जातींची निवड:

बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार मिरचीच्या जातीची निवड करावी.

 1. अग्निरेखा–
 • हिरव्या फळांचा तोडा करण्यास ही जात उपयुक्त आहे;
 • हेक्‍टरी सरासरी उत्पादन 25 ते 26 क्विंटल आहे.
 • भुरी व मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही.
 1. फुले ज्योती–
 • मसाला करण्यासाठी हि जात जास्त प्रमाणात वापरली जाते.
 • वाळलेल्या मिरचीचे 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर उत्पादन मिळते.
 • ही जात भुरी रोगाला कमी प्रमाणात बळी पडते, तर फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करते.
 1. ब्याडगी–
 • लाल मिरचीसाठी हि जात वापरली जाते.
 • साठवणुकीत फळांचा रंग चांगला टिकतो.
 • फळांवर सुरकुत्यांचे प्रमाण जास्त आहे.
 • फळांची साल जाड असते.
 1. ज्वाला –
 • हिरव्या मिरचीसाठी चांगली आहे.
 • तिखटपणा जास्त आहे.
 1.  पंत सी-1 –
 • ही जात हिरवी व लाल मिरचीसाठी चांगली आहे.
 • तिखटपणा जास्त आहे.
 1. फुले सई –
 • वाळविल्यानंतर रंग गर्द लाल होतो.
 • तिखटपणा मध्यम आहे.
 • ही जात फुलकिडी तसेच काळा करप्यास मध्यम प्रतिकारक आहे.

बिज प्रक्रिया:

गादी वाफ्यावर पेरणीपूर्वी तीन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे.

बियाण्याचा दर:

बियाण्याची मात्रा :1.0 किलो ग्रॅम प्रति हेक्टर

गादिवाफ्यावर पेरणी:

 • दोन ओळींतील अंतर १० सें.मी. ठेवून, एक ते 5 सें.मी. खोलीवर बियांची पातळ पेरणी करून बारीक मातीने बियाणे झाकावे.
 • बियाण्याची उगवण होईपर्यंत आच्छादन झाकून सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे.
 • वाफ्यास 25 ते 30 ग्रॅम फोरेट देऊन पाणी द्यावे.
 • पेरणीनंतर 30 दिवसांनी प्रति वाफ्यास रोपांच्या जोमदार वाढीसाठी 20 ते 25 ग्रॅम युरिया दोन ओळींमधुन पिकांस द्यावे.
 • रस शोषण करणा-या किडींसा व करपा रोगापासून संरक्षण होण्यासाठी 12 मि.लि. नुवाक्रॉन अधिक 25 ग्रॅम डायथेन एम – 45 प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून उगवण झाल्यानंतर दर दहा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.

लेख आवडला असल्यास रेटींग द्या आणि शेयर करा

Related posts

Shares