Search

मूग लागवड – पेरणी पश्चात व्यवस्थापन

मूग लागवड – पेरणी पश्चात व्यवस्थापन

buttons eng-minमूग हे एक द्विदल कडधान्य असून भारताव्यतिरिक्त चीन, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. ६५ ते ७० असा अतिशय कमी कालावधीत हे पीक तयार होत असल्याने सलग किंवा आंतरपीक म्हणून हे पीक घेतले जाते. ‘मूग लागवड पेरणी पश्चात व्यवस्थापनया लेखात आपण काही महत्वाचे पैलू जाणून घेऊया.

आंतरमशागत : पेरणीपासून २५ ते ३० दिवसाच्या आत एक खुरपणी करावी. पाहिले २५ ते ३० दिवस पीक तण विरहित ठेवावे. पेरणीपासून १० दिवसाचे आत विरळणी चे काम पूर्ण करावे.

मुगावरील रोग आणि नियंत्रण :

मोझॅक किंवा केवडा : हा रोग अतिसूक्ष्म विषाणूंपासून होतो. रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे पानावर पिवळे व हिरवे चट्टे मोठ्या प्रमाणात पडून पानाचा आकार कमी होतो यामुळे पानाच्या कर्रबग्रहण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परिणामी उत्पादनात घट होते.

भुरी : हा रोगदेखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पाने, फुले व शेंगावर बुरशीचा प्रभाव जाणून येतो. हळूहळू बुरशी पानाचा सगळं भाग व्यापते. भुरी रोग लवकर आल्यास उत्पादनात फारच घट होते.

नियंत्रण : सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक वाणांची लागवड करणे हा उत्तम उपाय आहे. रोगप्रतिकारक बियाणे नसल्यास बुरशी नाशकांचा वापर करून पिकाचे संरक्षण करावे. पहिली धुरळणी/फवारणी रोग दिसताच त्वरित करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी बाविस्टीन (कार्बेन्डेझीम) हे आंतरप्रवाही बुरशीनाशक २५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यानंतर भुरी रोगाचे प्रमाण कमी होऊन चांगले उत्पादन येते. जरुरीनुसार ८ ते १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

पीक संरक्षण : या पिकावर रोपावस्थेत व वाढीच्या कालावधीत मावा, तुडतुडे यासारख्या रस शोषनाऱ्या किडींपासून तसेच पाने खाणारी अळी, केसाळ अळी, पाने गुंडाळणारी अळी, शेंडा पोखरणारी अळी, पांढरी माशी आणि भुंगेरे या किडीपासून नुकसान होते. रस शोषणाऱ्या व पाने खाणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी मेलेथॉन ५० टक्के प्रवाही ५०० मी. ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के ५०० मि.ली. ५०० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी फवारणी करावी.

शेंगा पोखरणाऱ्या अळींच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही १ लिटर अथवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही ५५० मि. ली. ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

काढणी, मळणी आणि साठवण : परिपक्व शेंगांची तोडणी ८ ते १० दिवसाच्या अंतराने करावी. शेंगा वाळल्यानंतर मळणी करावी. दाणे उन्हामध्ये चांगले वाळवावे. धान्य पोत्यात भरण्यापूर्वी पोत्यास बाहेरच्या बाजूने बी.एच.सी. ५ टक्के भुकटी लावावी. धान्याची साठवण कोरड्या जागेत करावी.

Related posts

Shares