Search

मूग लागवड – पेरणी पूर्व तंत्रज्ञान

मूग लागवड – पेरणी पूर्व तंत्रज्ञान

buttons eng-min

मूग हे कडधान्यामधील एक महत्वाचे पीक असून लागवड क्षेत्र आणि उत्पादन याबाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. संपूर्ण महाराष्ट्रात या पिकाची लागवड केली जाते. खरिप हंगामात ज्वारी, कपाशी, भुईमूग यांसारख्या पिकात आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून मूगलागवड केली जाते. मूग लागवड पेरणी पूर्व तंत्रज्ञानाचे पैलू जाणून घेऊया.

जमीन : सर्वसाधारणतः हे पीक पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. मध्यम ते भारी जमिनीत हे पीक चांगले घेता येते.

हवामान : या पिकास उष्ण हवामान पोषक असून सर्वसाधारणतः २१ अंश ते ३५ अंश तापमानात या पिकाची चांगली वाढ होते. ७५० ते ९०० मि. मी. पाऊस पडणाऱ्या भागात मूग या पिकाचे चांगले उत्पादन येते. कडाक्याची थंडी या पिकास मानवत नाही.

पूर्व मशागत : पूर्वीचे पीक काढल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने नांगरून नंतर वखराच्या दोन तीन पाळ्या देवून चांगली भुसभुशीत करावी.

जिवाणू संवर्धक : पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबीयम जीवाणू संवर्धक लावून पेरणी केल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.

बीजप्रक्रिया : मूग या पिकास रोपावस्थेमध्ये मूळकुजव्या या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम किंवा बाविस्टीन यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति किलो ३ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

सुधारित वाण : महाराष्ट्रात जळगाव ७८१कोपरगावहे जुने वाण बऱ्याच वर्षांपासून खरीप लाग गाडीखाली आहेत. याशिवाय अकोल्यातील पंजाबराव कृषी विद्यापीठ भाभा परमाणू अनुसंधान यांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे टी.. पीहा वाण प्रसारित करण्यात आला आहे हा वाण कोपरगाव पेक्षा २४ टक्के अधिक उत्पादन देतो तसेच या वाणाची रोग प्रतिकारशक्ती देखील जास्त आहे. याशिवाय महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी यांनी खरीप हंगामासाठी मूगहे वाण पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित केलं आहे. तर उन्हाळी मुगाकरिता एस आणि पुसा वैशाखी हे वाण प्रचलित आहेत.

पेरणी : खरीप मुगाची पेरणी शक्यतो पावसाळा सुरू होताच करावी. पेरणी पाभरीने करावी. बियाणे ४ सें. मी. खोलीवर पेरावे. दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. ठेवून हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पेरावे. खरीप हंगामात मूग पीक ६० ते ७० दिवसात तयार होते. रब्बी हंगामात २५ ऑकटोबर ते ९ नोव्हेंबर पर्यंत पेरणी करावी . रब्बीतील मुगाचे पीक साधारणतः ११० दिवसात तयार होते. उन्हाळी हंगामात मुगाची पेरणी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. उन्हाळी हंगामात हे पीक ६० ते ६५ दिवसात तयार होते.

संदर्भ – कृषी विभाग, महाराष्ट्र शासन 

Related posts

Shares