Search

मे महिन्यात करायची शेती कामे – भाग – १

मे महिन्यात करायची शेती कामे – भाग – १
[Total: 1    Average: 1/5]

buttons eng-min

मे महिन्यात करावयाची कामे – भाग – १

मे महिन्याची चाहूल लागली आहे आणि बळीराजा आता शेतात विविध कामे करण्यात व्यस्त झाला आहे. कोकणात विविध पिके घेतली जातात. हे लक्षात घेता मे महिन्यात कामाचे नियोजन कसे करावे हे जाणून घेऊया.

आंबा / काजू :

 • आंबा पिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम २५ % (WDG) प्रवाही १ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकानॅझोल ५ मि.ली  किंवा कार्बेनडझीम १० ग्रॅम मिसळून वापरावे.
 • फळधारणा झालेल्या आंबा झाडास उपलब्धतेनुसार शक्य आहे तिथे प्रति झाडास १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावे.
 • यंदा आंबा फळांवर फळमाशांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी आंबा बागेत विद्यापीठाने शिफारस केलेले, हेक्टरी ४ या प्रमाणात मिथाईल इजीनॉल या अमिषाचे रक्षक सापळे लावावेत.
 • मोठ्या आकाराची काढणी योग्य फळे सकाळी दहाच्या आधी व दुपारी चार नंतर झेल्याच्या सहाय्याने काढावीत. काढलेली फळे सावलीत ठेवावीत.
 • फळे काढणीआधी किमान ८ दिवस आधीपर्यंत झाडावर कोणतेही औषध फवारू नये.

काजू:

 • काजू झाडावरील रोठा या किडीच्या नियंत्रणासाठी रोठ्याच्या अळ्या १५ मि. मी. आकाराच्या पटाशीच्या सहाय्याने काढून टाकाव्यात व क्लोरोपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) ५ मि. ली. प्रती लिटर या प्रमाणात द्रावण तयार करून प्रादुर्भित भाग त्या द्रावणाने चांगला भिजवावा व उरलेले द्रावण झाडाच्या बुंध्यालगत मुळाशी ओतावे.
 • काजुमध्ये काही ठिकाणी काढणीयोग्य बी तयार झालेली आहे. तयार झालेल्या बियांची काढणी करून ती उन्हामध्ये योग्यप्रकारे वाळवावी.

नारळ :

 • नारळावरील गेंडाभुंगा या दीदीच्या नियंत्रणासाठी बागेमध्ये शेणखताच्या खड्ड्यात दर दोन महिन्यांनी मिथील पॅरॅथिऑन २ टक्के धुरळावी.
 • नारळावरील गेंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त माड साफ करावा.
 • औषध देण्यापूर्वी नारळाची काढणी करावी.

भाजीपाला व फळबाग:

 • मिरचीवरील चुरडा मुरडा या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रसार करणाऱ्या पंढरी माशी या दिडीचे नियंत्रण करावे.
 • भेंडीवरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झॅकोनॅझोल ५ टक्के प्रवाही १० मिली १० लिटर पाण्यात या प्रमाणात फवारणी करावी.
 • भुईमुगावरील टिक्का आणि तांबेरा या रोगांच्या नियंत्रणासाठी प्राॅपीकोनॅझोल या बुरशीनाशकाची १० मिली  १० लिटर पाण्यात या मात्रेत फवारणी करावी.

दुभती जनावरे/ शेळ्या :

 • जनावरांना पाणी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी.
 • गोठ्यात हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.
 • पशुवैद्याकांच्या मार्गदर्शनाखाली कोंबड्यांना देवी प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.

संदर्भ – कोकण कृषी विद्यापीठ

Related posts

Shares