Search

मॉन्सून माहिती

मॉन्सून माहिती
[Total: 23    Average: 3.2/5]

मॉन्सूनच्या पावसाला कधी सुरुवात होणार याकडे बळीराजा लक्ष लावून बसला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे बळीराजा थोडासा सुखावला आहे. पुणे वेधशाळेने पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असून पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर या भागात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया मॉन्सून ची माहिती.

तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली ,सातारा,सोलापुरातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भातील यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा आणि मराठवाड्याच्या ब-याचशा भागात मान्सून सक्रीय झाला आहे. अरबी समुद्रात पुन्हा मान्सून सक्रीय होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असल्यानं मुंबईसह कोकणात दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. मान्सूनने राज्याचा ८० टक्के भाग व्यापला असून येणा-या दोन ते तीन दिवसानंतर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागातही मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याचे वृत्त आहे. तसेच कोकणातही मॉन्सून सक्रिय झाला आहे.
मागील दहा ते बारा दिवसांपूर्वीच मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. त्यानंतर मान्सूनचा प्रवास उत्तरेकडे सुरू झाला. मात्र, प्रतिकूल स्थितीमुळे राज्यातील कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाले असून पेरण्या कशा करायच्या या विंवचनेत आहे. या उलट कोकणात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. दक्षिण गुजरातपासून ते अगदी उत्तर केरळाच्या किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. यामुळे बाष्प आणि आर्द्रता यांचे प्रमाण कोकणाच्या भागात जास्त असल्याने पाऊस मुसळधार पडत आहे.

राज्याच्या उर्वरित भागात पाऊस पडण्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे गरजेचे आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत आंध्र प्रदेशाची किनारपट्टी पार करून ते पश्चिम मध्य बंगालच्या उपसागर आणि दक्षिण ओडिसापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Related posts

Shares