Search

मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता

मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता
[Total: 7    Average: 3.4/5]

यंदा पाऊस चांगला होणार अशी चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्रात यंदा मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सामान्‍यत: १ जूनला केरळमध्‍ये दाखल होणारा मान्‍सून दोन दिवस आधीच दाखल झाला. यामुळे महाराष्‍ट्रात मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणपणे दरवर्षी मान्सून १ जूनला केरळमध्‍ये येतो. त्‍यापुढे त्‍याचा पुढचा प्रवास सुरु होतो. त्‍यानंतर सात दिवसांत तो महाराष्ट्रात येतो. गेल्यावर्षी १८ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला होता.
मात्र यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे मुंबईसह राज्यात मान्सून लवकर येईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरवर्षी सरासरी दहा जूनच्या आसपास मुंबईत मान्सून दाखल होतो. सध्या बंगालच्या उपसागरासह केरळ, तमिळनाडूमध्ये मान्सूनची समाधानकारक वाटचाल सुरू असल्याने मुंबईतही वेळेपूर्वी दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दक्षिण अरबी समुद्रापासून मालदिव, लक्षद्वीप, तामिळनाडूकडे मान्सूनची आणखी पुढे वाटचाल सुरू आहे. सध्या त्या भागात मान्सून स्थ‌िरावण्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल वातावरण असल्याने मान्सून मुंबई व महाराष्ट्रात वेळेवर येईल, असा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत दक्षिण कोकण, उत्तर कोकण, उत्तर व दक्षिण मध्य महाराष्ट्रात गडगडाट व वेगवान वाऱ्यासह पावासाच्या सरी कोसळतील. एकूणच यंदा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने हि समाधानकारक बाब आहे.
राज्याच्या काही भागात कोकण, कोल्हापूर, विदर्भात नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्यांतील बहुतांश भागात पावसाच्या सरी बरसल्या. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलीय. मुंबईसह कोकणातील काही भागात अधून मधून पावसाच्या सारी बरसत आहेत.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे.

Related posts

Shares