Search

ग्रामीण भारतातील उद्योजिकांची यशोगाथा

ग्रामीण भारतातील उद्योजिकांची यशोगाथा

एकविसाव्या शतकातील महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मात्र असे असले तरीही ग्रामीण भागातील महिला शिक्षणाचा अभाव व रूढी परंपरा यांमुळे काहीशा पिछाडीवर राहिलेल्या दिसतात. अशा प्रतिकूल परिस्थितीला मात करून ग्रामीण भागातील अनेक स्त्रियांनी खडतर परिश्रम करून यशस्वी उदयोग उभारले आहेत. अशाच काही उद्योजिकांची कहाणी यशोगाथा पाहू!

1. मसाले व्यवसायाचे यश

खुटबाव (ता. दौंड) येथील सौ.कमलताई शंकर परदेशी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी शेतात मजुरी करताना आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापन केली. त्याद्वारे आज 32 प्रकारचे घरगुती मसाले तयार होत असून, त्यांना यशस्वी बाजारपेठ मिळत आहे.

उदयोगातून मिळणारा नफा

 • या उदयोगातून महिन्याला सुमारे अकरा हजार पाचशे रुपये निव्वळ नफा प्राप्त होतो.

संपर्क

सौ. कमलताई परदेशी, 9764558874

2. जरबेराच्या शेतीतून नवे रंग

अहमदाबाद येथे शिक्षण, तर मुंबई येथे बॅंकेत नोकरी करणाऱ्या ज्योतीताईंचा शेतीशी दुरान्वयानेच संबंध आला. मात्र, एका नाट्यमय घटनेतून पॉलिहाऊसमधील जरबेरा शेतीसाठी त्यांना प्रेरणा मिळाली. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत (एनएचएम) अनुदान मिळाले. गुणवत्ता व विपणनाच्या जोरावर अल्पावधीतच एकाचे दोन पॉलिहाऊस उभारले, तिसऱ्याची आखणी सुरू आहे.

त्यांच्याकडे सुमारे 14 ते 15 रंगांचे जरबेरा आढळतात. फुलांची तोडणी, प्रतवारी, पॅकिंगसाठी सहा महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

उदयोगातून मिळणारा नफा

 • मागणीनुसार दोन ते पाच रुपये प्रति नग या दराने फुले विकली जातात.
 • सरासरी तीन रुपये दर पकडला तर एक रोप 150 रुपयांचे उत्पन्न देते.
 • दहा गुंठ्यांतील सहा हजार 500 रोपांपासून वर्षभरात नऊ लाख 75 हजारांचे उत्पन्न मिळते.

संपर्क

सौ. ज्योती अरुण नंदर्षी, 9881083322

3. अल्पभूधारक पोल्ट्री व्यावसायिक

सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्‍यातील वळसंग येथील सुमारे तीस महिलांनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक कुक्कुटपालन सुरू केले आहे.

अंडी व पक्ष्यांच्या विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठ व संधीचा फायदा घेत व्यवसायात स्थैर्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पूरक व्यवसायाच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा पर्याय त्यांनी दुष्काळी भागात तयार केला आहे.

उदयोगातून मिळणारा नफा

 • प्रति हजार पक्ष्यांमागे प्रति महिना एक महिला सुमारे दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळते
 • आठवड्याला बाजारात एक महिला सुमारे 70 ते 80 अंडी विकते. अंड्यांचा प्रति नग दर पाच ते सात रुपये आहे
 • लहान वयाच्या पक्ष्यांना प्रति नग 150 ते 200 रुपये व मोठ्या पक्ष्यांना 250 ते 300 रुपये दर मिळतो

संपर्क

कन्याकुमारी बिरादार, 9764171721

4. अळंबीने दिला आधार

रत्नागिरी मधील  मुचरी गावातल्या महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून अळंबी उत्पादनासारखा वेगळा व्यवसाय करून गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून दिली.

अळंबीला चांगला बाजार असल्याने महिलांनी कृत्रीम शेड तयार करून अळंबी उत्पादन सुरू केले. उत्पादनाची पद्धत बरीच कष्टप्रद असली तरी महिलांनी ती सहजपणे केली. पहिल्याच वर्षी  150 रुपये किलोप्रमाणे अळंबी विक्री झाली. अनेक ठिकाणी प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन त्यांनी अळंबीची विक्री केली.

त्याचबरोबर पावसाळ्यात भातशेतीची कामेही महिला करतात. आता आत्मविश्वास वाढल्याने अळंबीचे मोठे युनिट उभारण्याचे स्वप्न घेऊन या महिला पुढे जात आहेत.

उदयोगातून मिळणारा नफा

 • गटातील प्रत्येक महिला वर्षाकाठी पाच ते दहा हजार रुपये मिळवित आहेत.

5. केळीपासून चिप्स,बिस्किटे

साकळी (जि. जळगाव, ता. यावल) येथील शोभा वाणी यांनी केळीपासून चिप्स, चिवडा, शेव, बिस्किटे, लाडू, गुलाबजाम आदी नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करून यशस्वी प्रक्रिया उद्योजक म्हणून नाव कमावले आहे.

प्रक्रिया उद्योगाद्वारे केळीचे मूल्यवर्धन केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे जिजामाता कृषिभूषण पुरस्कार आणि  सह्याद्री मराठी वाहिनीतर्फे कृषिरत्न पुरस्कार मिळाला. तसेच राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या वतीने तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय फेलोशिप प्राप्त झाली.

उदयोगातून मिळणारा नफा

 • वर्षभरात सुमारे 10 ते 15 टन चिप्स, 15 टन चिवडा, शेव, बिस्कीट, लाडू, पीठ यांची विक्री होते.
 • वर्षभरात सरासरी 150 टन कच्च्या केळीवर प्रक्रिया होते.
 • सुमारे 25 लाख रुपयांची वार्षिक उलाढाल

संपर्क

शोभा वाणी, 9373903929

Related posts

Shares