Search

राष्ट्रीय फलोत्पादनांतर्गत नवीन फळबागांची स्थापना करणे

राष्ट्रीय फलोत्पादनांतर्गत नवीन फळबागांची स्थापना करणे

रोजगार हमी योजनेआन्तर्गत फालोद्यांन कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रामध्ये फळपिके वाढीला मोठी चालना मिळाली. बहुवर्षीय पिकांसाठी राज्यामध्ये द्राक्षे, पेरू व आंबा फ़ळलागवड तसेच स्ट्रॉबेरी, केळी, पपई व प्लाण्टेशन क्रॉप्स या साठी एकात्मिक पेकेज या बाबींसाठी विविध मापदंडानुसार अनुदान देय आहे.

fruit

उद्देश :

१. क्षेत्रविस्तार घटकामध्ये विविध फळ पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर करून उत्पादकतेमध्ये वाढ करणे.

२. लागवड साहित्याचा वापर मानांकित रोपवाटीकेमधुनच करणे.

३. पिक समूह आधारितच फळपिके /फुलपिके /मसालापिके / लागवड पिके सुगंधी वनस्पती यांची लागवड करणे.

४. आतापर्यंत झालेल्या लागवडीचा विचार करून फळ पिक निहाय समूह स्थापन करणे.

५. या समूहाच्या सर्वकष विकासासाठी सद्यस्थिती व वाव यांचा विचार करून उत्पादन ते बाजारपेठ प्रकल्प आराखडा तयार करणे.

६. उपलब्ध साधन सामुग्री वचारात घेऊन समूह आधारित विकास आराखडा तयार करणे वाट्याची अंमलबजावणी करणे.

 

  • द्राक्ष लागवड:

द्राक्ष पिकाच्या ३ मी * ३ मी अंतराच्या लागवडीस लागवड साहित्यासाठी रु १६,६५०/- प्रती हे.

एकात्मिक कीड व्यवस्थापन व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी १०००००/- प्रती हे.

द्राक्षे पिकावर ठिबक सिंचना सहीत एकात्मिक पेकेज बसविणेसाठी रु २१६६५०/- रु  प्रती हे मंजूर  मापदंडाच्या ४०% रु८६६६०/-  प्रती हे. देय राहील.

यामध्ये द्राक्ष पिकासाठी मांडव उभारणीचाही समावेश आहे.

पहिल्या , दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात अनुक्रमे ६०:२०:२० टक्के अनुदान देय राहील.

लागवड साहीत्य हे एन.आर.सी. संस्था, कृषी विद्यापीठ  कृषी विज्ञान केंद्र व मानांकित रोपवाटिका याकडुनच घेण्यात यावे.

  • आंबा घनलागवड ठिबक सिंचन हित.:

आंबा पिकाच्या घन लागवडीसाठी ठिबक सिंचन सहीत  ३ मी  बाय ६ मी  रु ९०८७५/- एकुण मापद्ण्डाच्या ४० टक्के २२७९०/- प्रती हे. अनुदान देय राहील. जर ठिबक सिंचन विरहित असल्यास रु. ३ मी  बाय ६ मी सहीत रु५६९७५/- एकुण मापद्ण्डाच्या ४० टक्के ३६३५०/- प्रती हे.

  • पेरू घनलागवड :

पेरू घनालागावाडीसाठी ठिबक सिंचन सहीत  ३ मी  बाय ३ मी  रु१३१०००/- एकुण मापद्ण्डाच्या ४० टक्के रु. ५२६९२/- प्रती हे अनुदान देय राहील

पेरू पिकाच्या घन लागवडीसाठी ठिबक सिंचन विरहित रु ७३३३०/- एकुण मापदंडाच्या ४०%  रु २९३३२/- प्रती हे. अनुदान देय राहील. या प्रमाणे दुसऱ्या व तिसऱ्या  वर्षात अनुक्रमे ६०:२०:२० टक्के अनुदान देण्यात यावे.

 

  • स्ट्रॉबेरी लागवड :

strawberry

स्ट्रॉबेरी हे समशीतोष्ण हवामानातील पिक असून हे पिक सातारा पुणे अहमदनगर नाशिक भागातही चांगल्या प्रकारे येते. स्ट्रॉबेरी लागवड समूह पद्धतीने केल्यास फायद्याची ठरते स्ट्रॉबेरीच्या लागवडी साठी सेल्वा, आयर्विन, स्वीट चार्ली, आस्ट्रेलिअन सीस्केप कामारोजा, डग्लस, चलेण्डर पाजारो इ. जातीची निवड करावी.

 

स्ट्रॉबेरी पिकाच्या  (०. ५० मी  * १. ० मी  ) अंतराच्या लागवडीस लागवड साहित्यासाठी रु /- १०,०००/- प्रती हे. व निविष्ठासाठी १,००,०००/-आणि ठिबक सिंचन सहीत मल्चिंग साठी एकूण रू. २,१०,०००/- प्रती हे. मापदंडाच्या रु. ८४,०००/- प्रती हे. अनुदान देय राहिल. लागवड साहीत्य एन.आर.सी. संस्था, कृषी विद्यापीठ  कृषी विज्ञान केंद्र व मानांकित रोपवाटिका याकडुनच घेण्यात यावे.

 

  • केळी लागवड :

राज्यात केळी या पिकाच्या लागवाडीस मोठा वाव आहे. ऊती संवर्धन तंत्रज्ञानाने तयार केलेल्या लागवड साहीत्याचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळते. योजानेअंतर्गतची लागवड हि ऊती संवार्धनाद्वारे करण्यात यावी. लागवड करताना सुधारित व निर्यातक्षम जाती उदा. ग्रेंड नाईन, श्रीमंती या सारख्या सुधारित वाणांची निवड करावी.

लागवड साहीत्य डि.बी.टी. , मानांकीत टिश्युकल्चर प्रयोगशाळेतुन, आय.सी.आर. संस्था,कृषि विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र तसेच हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे यांचेकडुन घेण्यात यावे.

केळी लागवड ऊती संवर्धन निर्मीतीद्वारे १.८ मी. * १.८ मी. अंतराच्या लागवडीस लागवड साहीत्याच्या रु ५२४६२/- प्रती हे. तर निविष्ठासाठी ५०,०००/- प्रती हे. वा ठिबक सिंचन सहीत एकात्मिक प॔केजसाठी रु. ५८४००/- असे एकुण १६०८६२/- प्रती हे. मंजुर मापदंडाच्या ४०% रु. ६४३४४/- प्रती हे. अनुदान देय राहील. दुस-या वर्षाचे अनुदान ९०% झाडे जिवंत असण्याच्या अटीवर देय राहील.

 

  • पपई लागवड:

पपई पहील्या व दुस-या वर्षात अनुक्रमे ७५ : २५ टक्के अनुदान देय राहील. लागवड साहीत्य एन.आर.सी. संस्था, कृषी विद्यापीठ  कृषी विज्ञान केंद्र व मानांकित रोपवाटिका याकडुनच घेण्यात यावे.

पपई लागवड (१.८ मी.* १.८ मे. ) अंतराच्या लागवडीस, लागवड साहीत्यासाठी रु. ४१६५५/- प्रती हे. निविष्ठासाठी रु. २०,०००/- प्रती हे. ठिबक सिंचन साहित रु. ५८४००/- असे एकुण रु. १,२०,०५५/- प्रती हे. मापदंडाच्या ४०% रु. ४८,०२२/- प्रती हे. अनुदान देय राहील.

 

स्त्रोत : नेशनल होर्टीकल्चर मिशन, महाराष्ट्र

Related posts

Shares