Search

रासायनिक तण नाशकांचा वापर

रासायनिक तण नाशकांचा वापर

जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अंतर्मसंगतीतीतील महत्वाचे अंग असू त्यामध्ये मुख्यतः किडी व रोगांचा बंदोबसत करणे एवढेच समजले जाते. परंतु पीक उत्पादनात कमालीचं घेत निर्माण करणारा आणखी एक महत्वाचा जैविक घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव होय. रोग व किडींमुळे होणाऱ्या बुकसानीपेक्षा ताणांमुळे पीक वाढ, वैकास आणि उत्पादनावर होणार परिणाम कितीतरी पटीने अधिक आहे. रासायनिक तण नाशकांचा वापर करून तण नियंत्रण करता येऊ शकते. या लेखात आपण विविध रासायनिक तण नाशके आणि त्यांचे फायदे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

महत्वाची तणनाशके

२, ४- डी : हे घोळ, चांदणी, काटेमाठ, वसंतवेल, दीपमाळ, तांदुळजा यांसारख्या रुंद पानांच्या द्विदल तणांचा नॅश करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी, मका, गहू, ऊस यांसारख्या द्विदल किंवा रुंद पानांच्या पिकांना हानिकारक आहे. त्यांना यापासून नुकसान पोहोचते. हे तणनाशक तण उगविण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर असे दोन्ही वेळा मारता येते. हे तणनाशक सोडिअम क्षार व इस्टर या तीन संयुगांच्या स्वरूपात मिळते.

अॅट्राझीन : हे निवडक तणनाशक असून ज्वारी, बाजरी, मका, ऊस, द्राक्षे व इतर पिकांमधले वार्षिक रुंद पानाच्या गावात वर्गातील तणांचा नाश करते. तण उगवणीपूर्वी किंवा उगवणीनंतर फवारता येते.

बासालीन : हे निवडक तणनाशक असून वर्षायू गावात व रुंद पानांचे तण यासाठी उपयुक्त आहे. कापूस, भुईमूग, सोयाबीन, वाटाणा, टोमॅटो, बटाटे, हरभरा, तूर, वांगी इत्यादी पिकातील तणांचा नाश करते. याचा वापर मुख्य पीक पेरण्याआधी किंवा ते रुजण्यापूर्वी करावा. हेक्टरी १ ते २ लिटर वापरावे.

स्टॅम एफ-३४ (प्रोपानिल) : गवतवर्गीय तणे व रुंद पानांची तणेही निवडकपणे या तणनाशकाकडून नष्ट केली जातात. हे स्पर्शजन्य तणनाशक आहे. या तणनाशकामुळे दोन ते चार पानांच्या अवस्थेत असणारी तणे लवकर नष्ट होतात.

पॅरक्वॉट :  हे स्पर्शजन्य साधारण तणनाशक आहे. या तणनाशकाचा मुख्यत्वे गवतवर्गीय तणे नष्ट करण्यासाठी वापर होतो. तसेच द्राक्षे, मोसंबीवर्गीय पिके, चहा, कॉफी, रबर वैगरे गावातवर्गीय तणे व पाण्यात वाढणारी तणे नष्ट करण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो.

डायक्वॉट : या स्पर्शजन्य साधारण तणनाशकाकडून सर्व प्रकारची तणे नष्ट होतात. मात्र द्विदलवर्गीय तणांसाठी हे विशेष प्रभावी असून पाण्यात वाढणाऱ्या ताणांसाठीही उपयुक्त आहे.

मॅचेट (ब्युटाक्लोर) : लावणी केलेल्या व पेरलेल्या भट पिकातील गवतवर्गीय तणे तसेच रुंद पानांच्या तणांचा बंदोबस्त मॅचेट वापरून चांगल्या प्रकारे करता येतो. दाणेदार स्वरूपातील तणनाशक तण उगविण्यापूर्वी तर द्रव स्वरूपात मिळणारे तणनाशक तणे उगविल्यानंतर फवारतात.

ग्लायफोसेट ४१ एस. एल. (ग्लायसिल/ राऊंड अप/ ग्लायफॉस) : हे अनिवडक तणनाशक असून लव्हाळा, हरळी किंवा रुंद पानांच्या ताणांचाही उत्तम प्रकारे नॅश करते. विशेषकरून हे पेरणीपूर्वी लव्हाळ्याचा नॅश करण्यासाठी वापरले जाते.

 

Related posts

Shares