Search

रुसलेला वरुणराजा लवकरच बरसेल, जलधारा बरसताच बळीराजा हसेल…

रुसलेला वरुणराजा लवकरच बरसेल, जलधारा बरसताच बळीराजा हसेल…

पाऊस बरसला आणि बळीराजा सुखावला… मागील महिन्यात झालेल्या जोमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. जमिनीची मशागत झाल्यानंतर वरुणराजाने शेतकऱ्याला उमेद दिली. पण म्हणतात ना निसर्ग लहरी आहे. वातावरणात बदल झाला आणि बरसणारे ढग रुसले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले होते.

मात्र आता रुसलेला पूस पुन्हा बरसण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ झाली आहे तसेंच पूर्व भारतात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे पाऊस पडण्यास पोषक वातावरण तयार होण्याची शक्‍यता वाढलीय . बुधवारपर्यंत  कोकणामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे  आहे. तर गुरुवारी कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

राज्यात जवळपास 8 ते 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पावसाने उघडीप दिली असून, राज्यातील कमाल तापमानात 1 ते 7 अंशांची वाढ झाली आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील भिरा येथे 35 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून, सरासरीच्या तुलनेत 6.9 अंशांची वाढ झाली आहे. तर मराठवाड्यातील परभणी येथेही 37.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर प्रदेशातील बहरीच जिल्ह्यातील हिमालय पर्वताच्या पायथ्यालगत असलेल्या टेकड्यांपासून बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागापर्यंत विस्तारला होता. बंगालच्या उपसागर, पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये ढगांची दाटी झाली आहे. गुरुवारपर्यंत  हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू- कश्‍मीर, पंजाब, हरियाणा , चंडीगड दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, आसाम, मेघालयासह ईशान्येकडील भागात जोरदार पाऊस पडण्याची तसेच बुधवारनंतर केरळ, कर्नाटक किनारपट्टी, कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

Related posts

Shares