Search

रेशीम अळीचे संगोपन

रेशीम अळीचे संगोपन

buttons eng-minभारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र असे असले तरी निसर्गसह अनेक गोष्टींवर शेती अवलंबून असल्याने काहीसा अनिश्चित असा हा व्यवसाय आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांनी शेतीवर आधारित पूरक उद्योग करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी रेशमी शेती हा एक चांगला मार्ग आहे.

Untitled-1 (1)

यापैकी महत्वाच्या अशा रेशीम अळीचे संगोपनयाबाबत माहिती जाणून घेऊया

 • रेशीम उद्योग हा शेतीला एक चांगला जोडधंदा असून या उद्योगापासून आपणास मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते.
 • भारतात कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा पारंपरिक रेशीम उद्योग करणारी राज्य म्हणून उल्लेख केला जातो.
 • महाराष्ट्रात देखील रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत असून रेशीम उद्योग घेणाऱ्या अपारंपरिक राज्यामध्ये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर आहे.

image3

 • राज्यामध्ये एकूण 20-22 जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग शासनामार्फत राबविला जात आहे.
 • रेशीम उद्योगामध्ये रोजगाराची प्रचंड क्षमता असून ग्रामीण भागाचा कायापालट करणारा आहे.
 • बीड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास अत्यंत अनुकुल आहे, शेतकऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास हा उद्योग फायद्याचा ठरू शकतो.

रेशीम उद्योगातील महत्वाचा दुसरा भाग म्हणजे रेशीम अळीचे संगोपन करुन रेशीम कोष निर्मिती करणे हा होय. याबाबत थोडी माहिती घेऊया.

 • रेशीम अळीचे जीवनचक्र हे अंडी, अळी , कोष व पतंग अशा अवस्था मधून (टप्प्यात ) एकूण 48 ते 52 दिवसात पूर्ण होते.

रेशीम शेती200x200

 • अंडी अवस्था 10 ते 12 दिवस, अळी 25 ते 26 दिवस , कोष अवस्था 10 ते 12 दिवस व पतंग अवस्था ही फक्त 3 ते 4 दिवसाची असते.
 • अळी अवस्थेमध्येच फक्त तुतीचा पाला अळ्यांना खाऊ घातला जातो.
 • अळी मोठी झालेवर तुती झाडांच्या फांदया कापून आणून अळयांना खाऊ घातल्या जातात.

image4

 • 25 ते 26 दिवस तुती पाला खाल्यानंतर अळी स्वत:भोवती रेशीम कोष तयार करते.
 • रेशीम अळीचे संगोपन करण्यासाठी रेशीम किटक संगोपनगृह बांधणे आवश्यक आहे.

image2

 • किटक संगोपन करतेवेळी किटक संगोपनगृहामध्ये स्वच्छतेला अत्यंत महत्व आहे.
 • एक पिक घेतल्यानंतर शेड निरजंर्तुकीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे.
 • एक एकर तुती लागवड असल्यास कमीतकमी 50 फूट लांब व 20 फूट रुंदीचे किटक संगोपनगृह (शेड) आवश्यक आहे.
 • रेशीम अळीचे संगोपन हे मुख्यत्वे 22 ते 28 डिग्री सें.ग्रे. तपमान व 60 ते 85 % आर्द्रता या वातावरणामध्ये केले जाते.

Untitled-1 (1)

 • सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये दुबार जातीच्या रेशीम धाग्याला खूपच चांगली मागणी आहे. यासाठी भारतात सध्या दुबार जातीच्या वेगवेगळ्या हायब्रीडचा वापर करण्यात येत आहे.

Related posts

Shares