Search

रोपांमधील आर्द्रता टिकविणारी संजीवनी

रोपांमधील आर्द्रता टिकविणारी संजीवनी

भारतातील शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. भौगोलिक विविधतेप्रमाणे पावसाचे प्रमाण देखील कमी जास्त होत असते. अशावेळी मग पाण्याच्या कमतरतेवर मात कशी करावी? अशी समस्या शेतकऱ्यांना भेडसावते. योग्य नियोजनाअंतर्गत या समस्येवर निश्चित तोडगा निघू शकतो. रोपांमधील आर्द्रता टिकविणारी संजीवनी या लेखात आपण अशाच एका प्रभावी उत्पादनाबाबत माहिती घेणार आहोत.

शेतकरी बांधवांच्या या समस्येवर सखोल अभ्यास करून वेस्ट कोस्ट ग्रुप या नामवंत कंपनीने रिटेन हे प्रभावी उत्पादन बाजारात आणले आहे. या उत्पादनाचा उपयोग रोपांना किंवा पिकाला भेडसावणाऱ्या पाण्याची कमतरता या समस्येवर तोडगा निघू शकतो. याचे एक उत्तम उदाहरण सोलापूरच्या मंगेवाडी येथील श्री अरुण यलमार यांच्याकडे आहे.

रिटेन  ची यशोगाथा

रिटेन च्या वापराचे मूळ कारण म्हणजे पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांमधील कमी वाढ होण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवणे आहे. श्री अरुण यलमार यांची डाळिंबाची शेती होती. डिसेंबर महिन्यातील उष्ण तापमानामुळे (सन बर्नमुळे) फळांवर काळे डाग येऊ लागले होते. जशी फळे मोठी होत गेली तसा काळ्या डागांचा आकार देखील वाढू लागला. यामुळे काढणीनंतर फळांना चांगला बाजारभाव मिळेल की नाही अशी चिंता निर्माण झाली.

यादरम्यान, श्री अरुण यलमार यांना वेस्ट कोस्ट ग्रुप चे रिटेन उत्पादन सुचविण्यात आले. आठवड्याच्या अंतराने त्यांच्याकडील गणेश/ भगवा या डाळिंबाच्या जातीवर दोन स्प्रे करण्यात आले. ज्या रोपांवर रिटेन ची फवारणी करण्यात आली त्या रोपांवर सन बर्न चा प्रभाव कमी झाल्याचे निदर्शनास आले.

रिटेन  कसे वापरावे?

  • रिटेन सगळ्या फुल आणि फळझाडांसाठी वापरता येऊ शकते.
  • रोपावस्था तसेच काढणीपूर्व काळात रोपांना अधिक पाण्याची आवश्यकता  असते, हे लक्षात घेता या दरम्यान रिटेन चा वापर केल्यास निश्चितपणे चांगले परिणाम मिळू शकतात.
  • एक लिटर पाण्यामध्ये २-३ मि. ली. रिटेन मिसळून त्याची फवारणी करावी.

रिटेन  नेमके काय करते?

  • रिटेन मधील मिश्रण रोपाभोवती किंवा पिकाभोवती एक प्रकारचे आवरण तयार करते.
  • यामुळे पिकाची पाण्याअभावी निर्माण होणारा ताण सहन करण्याची क्षमता वाढविते.
  • रिटेन च्या वापराने रोपाला हल्की चकाकी प्राप्त होते.

रिटेन  चे फायदे

  • सर्व प्रकारची फळझाडे आणि फुलझाडे यांच्या वाढीसाठी उपयोगी.
  • दुष्काळी परिस्थिती तसेंच प्रतिकूल वातावरणीय बदलातही रोपांचे संरक्षण करते. काढणी, वाहतूक, पुर्नलागवड तसेंच थंडीतील साठवणुकीदरम्यान आर्द्रता कमी होण्यापासून बचाव करते.
  • रिटेन च्या वापरामुळे पॉली हाऊस मध्ये लागवड करण्यात येणाऱ्या गुलाब, जरबेरा यासारख्या विविध शोभिवंत फुलांमध्ये कापणी, साठवणूक, वाहतूक आणि पुनर्लागवडी दरम्यान पाण्याचा ऱ्हास कमी होण्यास मदत होते.
  • रिटेन मुळे टोमॅटो, द्राक्ष तसेच डाळिंब यासारख्या फळझाडांना कमी ताण सहन करावा लागतो. परिणामी फळधारणा आणि फुलधारणा अधिक जोमाने होते. म्हणूनच फळ झाडांसाठी रिटेन चा वापर केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते.खरेदीसाठी व अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा ⇓

जिल्हा:

Related posts

Shares