Search

लसुण लागवड

लसुण लागवड

buttons eng-minलसूण

Garlic Farm

महाराष्‍ट्रात जवळ जवळ 5000 हेक्‍टर जमीन हया पिकाखाली असून नासिक पुणे ठाणे तसेच मराठवाडा विदर्भात लागवड केली जाते.अन्‍नपदार्थ स्‍वादीष्‍ट होण्‍यासाठी दैनंदिन आहारात लसणाचा उपयोग करतात. चटण्‍या, भाजी व लोणचे यात लसणाचा वापर केला जातो.

हवामान व जमीन

Garlic Farm 2

 

समशितोष्‍ण हवामान लसूण लागवडीस उपयुक्‍त असते. मात्र अति उष्‍ण व अति थंड हवामान या पिकास मानवत नाही. दिवसाचे 25 ते 28 अंश सें. ग्रे. व रात्रीचे 10 ते 15 अंश सें.ग्रे. तापमानात गडयांची वाढ चांगली होते.

मध्‍यम खोलीच्‍या भरपूर सेंद्रीय खते घातलेल्‍या रेती मिश्रित कसदार तणविरहित जमिनीत पीक चांगल्‍याप्रकारे घेता येते.

पूर्वमशागत

Garlic Farm

मध्‍यम खोलीची नांगरट करुन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमीन तयार करते वेळी हेक्‍टरी 30 गाडया (15 टन) शेणखत मिसळावे. वर पाणी देण्‍यास सोईस्‍कर अशा आकाराचे (3×2) अथवा (3.5×2मी) सपाट वाफे तयार करावेत.

जाती व लागवड

LAgavd

महाराष्‍ट्रात पांढया रंगाच्‍या जामनगर जातीची तसेच गोदावरी, श्रवेता या जातीची लागवड केली जाते.

बियाण्‍याची निवड

लसणाच्‍या गाठया एकावर एक अशा गोलाकार पाकळयांनी बनलेली असते. गाठयातील पाकळया सुटया करण्‍यासाठी गडडे पायाखाली तुडवून मग साफ केल्‍या जातात. लागवडीसाठी मोठया निरोगी व परिपक्‍व पाकळयांच्‍या उपयोग करावा.

वरखते

लावणीच्‍या वेळी लसणास हेक्‍टरी 50 किलो युरीया 300 किलो सुपर फॉस्‍फेट व 100 किलो म्‍युरेट ऑफ पोटॅश मिसळून द्यावा म्‍हणजे पिकांची वाढ जोमदार होते.

आंतर मशागत

Garlic Round

मसणाच्‍या पाकळया लावल्‍यानंतर एक महिन्‍याने खुरपणी करुन गवत काढून घ्‍यावे. त्‍यानंतर तण पाहुन 1-2 वेळा निंदणी करावी. लागवडीनंतर अडीच महिन्‍यांनी लसणाचे गाठे धरण्‍यास सुरुवात होते. यावेळी हात कोळपणी करुन माती चांगली मोकळी ठेवावी म्‍हणजे मोठया आकाराचे व चांगले भरदार गाठे धरण्‍यास मदत होते.

पाणी देणे

Water

लावणीनंतर पाण्‍याची पहिली पाळी सावकाश द्यावी. दुसरी पाळी त्‍यानंतर 3-4 दिवसांनी आणि पुढच्‍या हवामानानुसार 8 ते 12 दिवसांनी द्याव्‍यात. काढणीच्‍या दोन दिवस अगोदर पाणी द्यावे.

किड व रोग

किडी

बोकडया : ही किड पानातील रस शोषुन झाडे अशक्‍त्‍ा बनवतात.

उपाय सायपर मेथ्रीन 25 टक्‍के प्रवाही 5 मिली 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

रोग

करपा व भुरी : या दोन्‍ही रोगांमुळे अनुक्रमे पाने गर्द तांबडया रंगाची व पांढया रंगाची होतात व अटळ स्थितीत झाडे मरतात. उपाय ताम्र्रयुक्‍त बुरशीनाशकाचा वापर करावा.

काढणी व उत्‍पादन

Garlic Harvest

लावणीनंतर साडेचार ते पाच महिन्‍यांनी हे पीक काढणीस योग्‍य होते. पिवळी पडावयास लागली म्‍हणजे गाठे काढावयास तयार झााले असे समजावे. लसून पातीसह तसाच बांधून ठेवावा. म्‍हणजे 8 -10 महिने टिकतो.

Garlic Harvest2

Related posts

Shares