Search

वांगी लागवड

वांगी लागवड

वांगी तसं पाहायला गेलं तर सर्वसामान्यांच्या आवडीची भाजी. प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ यांचा संगम असलेल्या या भाजीत ‘अ’,’ब’ आणि ‘क’जीवनसत्वांबरोबर लोह देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. वांगी तुलनेत कमी प्रमाणात नाशवंत असल्याने दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी हे एक उत्तम पीक आहे.

हवामान आणि जमीन:

 • या पिकाला कोरडे व थंड हवामान चांगले मानवते.
 • ढगाळ वातावरण आणि सतत पडणारा पाऊस अशा परिस्थितीत कीड व रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
 • ३० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान असेल तर फळधारणेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादन कमी होते.
 • साधारण १३ ते २१ से. तापमान या पिकासाठी चांगले मानले जाते.
 • वांग्याचे पीक वेगवेगळ्या जमिनीमध्ये येऊ शकते.
 • पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम काळी,कसदार जमीन या पिकासाठी उत्तम असते.
 • नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत वांग्याचे उत्पादन अधिक येते.
 • ५.५ ते ६.० सामू असलेल्या जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते.

लागवड व हंगाम:

 • वांग्याची लागवड वर्षभर करता येते.
 • हेक्टरी ५०० ग्रॅम बियाणे पुरते.
 • संकरित वाणांचे १५० ग्रॅम बियाणे पुरते.
 • गादीवाफ्यावर ८ ते १० सें. मी.अंतरावर ओळीतून बी पेरावे.
 • साधारण १२ ते १५ सें. मी.उंचीची झाल्यावर रोपांची लागवड करावी.
 • बी पेरल्यानंतर साधारण ४ ते ५ आठवड्यांनी रोपे लागवडीस तयार होतात.
 • कसदार जमिनीत ९० x ९० सें. मी.मध्यम प्रतीच्या जमिनीत ९० x ७५ सें. मी. आणि हलक्या जमिनीत ७५ x ६० सें.मी.अंतर ठेवावे.

सुधारित जाती:

 • वैशाली
 • मांजरी गोटा
 • रुचिरा
 • प्रगती
 • पुसा पर्पल क्लस्टर
 • कृष्णा संकरित
 • फुले हरित
 • अरुणा
 • अनुराधा

खत व पाणीपुरवठा:

 • जमीन तयार केल्यानंतर जमिनीत हेक्टरी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे.
 • अधिक उत्पादनासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश हि रासायनिक खते द्यावीत.
 • नत्राची अर्धी मात्रा ३० दिवसांच्या अंतराने तीन हप्त्यात सांप्रमाणत विभागून द्यावी.
 • नत्राची उर्वरित मात्रा ३० दिवसांच्या अंतराने तीन हप्त्यात समप्रमाणात विभागून द्यावी.
 • पहिला हप्ता लागवडीनंतर दोन महिनात्यांनी दुसरा त्यानंतर एक महिन्यांनी आणि तिसरा शेवटचा हप्ता लागवडीनंतर साडेतीन महिन्यांनी द्यावा.
 • रोपांचे स्थलांतर केल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
 • हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
 • ठिबकसिंचनाच्या माध्यमातून वांग्यासाठी पाणी नियोजन केल्यास तणांच्या वाढीवर नियंत्र राहून उत्पादनात भर पडते.

आंतरमशागत:

 • पिकामध्ये नियमित खुरपणी,कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा.
 • झाडांना मातीची भर द्यावी. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
 • पिकाच्या दोन ओळींमध्ये काळ्या पॉलीथीनचे आच्छादन केल्यास तणांवर नियंत्रण राहते.

संजीवकांचा वापर:

 • फुलधारणेत वाढ होण्यासाठी २-४ डी, एन.ए. ए.आणि ४- सी. पी. यु.हि संजीवके अतिशय परिणामकारक आहेत.
 • पेरणीपूर्वी बियाणे २-४ डी. चे २ पी. पी. एम.द्रावण फुले येणे सुरु झाल्यावर ६० ते ७० दिवसांपर्यंत एका आठवड्याच्या अंतराने संपूर्ण झाडावर फवारावे.
 • त्यामुळे उत्पादनात ५० टक्क्यांनी वाढ होते.

कीड आणि रोग:

कीड:

 • फळे पोखरणारी अळी, खोड पोखरणारी अळी, नागअळी.

रोग:

 • करपा, भुरी, पानांवरील ठिपके, फळकुज.

काढणी:

 • फळाची पूर्ण वाढ होऊन त्याला आकर्षक रंग प्राप्त झाल्यानंतर काढणी करावी.
 • फळाचे देठ धारदार चाकूने कापावेत.
 • ४ ते ५ दिवसांच्या अंतराने १० ते १२ वेळा वांग्याची तोडणी करता येते.
 • फळांची प्रतवारी करून विक्रीस पाठवावीत.

उत्पादन :

 • वांग्याचे सरासरी उत्पादन २५ ते ३० टन पर्यंत मिळते.
 • तर वैशाली जातीचे हेक्टरी ३० – ४० टॅन व कृष्ण या संकरित जातीचे हेक्टरी ३० – ३५ टन उत्पादन मिळते.

Related posts

Shares