Search

शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा प्रकल्प

शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा प्रकल्प
उद्देश –
1. राज्यातील मोठ्या शहरांच्या सभोवती बाजारपेठेतील मागणीनुसार खुल्या क्षेत्रामध्ये तसेच नियंत्रित वातावरणामध्ये भाजीपाल्याचे क्षेत्र वाढविणे.
2. पारंपारिक भाजीपाला लागवडीमध्ये बदल करून सुधारित व संकरित वाणांचा लागवडीसाठी उपयोग करणे.
3. अधिक गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आधुनिक/उच्चतंत्र लागवड पद्धतीचा अवलंब करणे.
4. भाजीपाल्याची समूह स्वरूपात लागवड करून काढणीपश्‍चात व्यवस्थापन, पुरवठा साखळी व विपणन व्यवस्था बळकट करणे आणि त्याद्वारे उत्पादकाच्या उत्पन्नात वाढ करणे.1. लाभार्थी निवड –
1.1 भाजीपाला लागवडीचा प्रकल्प हा फक्त समूह स्वरूपातच राबवावयाचा आहे.
1.2 लाभार्थी हा सदर प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या भाजीपाला उत्पादक समूहाचा सदस्य असणे बंधनकारक राहील.
1.3 लाभार्थींच्या नावे स्वतःची जमीन असावी. त्यासाठी 7/12 उतारा सादर करावा.
1.4 लाभार्थी शेतकऱ्यांकडे भाजीपाल्याच्या उत्पादनाकरिता पुरेशा ओलिताच्या सोयी सुविधा उपलब्ध असाव्यात.
1.5 महिला शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प वा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ द्यावा.
1.6 नोंदणीकृत महिला/ पुरुष बचत गटामार्फत भाजीपाल्याची लागवड प्रस्तावित करण्यात येत असल्यास त्यालाही प्राधान्य देण्यात यावे.
1.7 एका लाभार्थ्यांकडे प्रकल्पामध्ये समाविष्ट बाजीपाला लागवडीचे किमान 0.10 हे. क्षेत्र असावे. वैयक्तिक लाभार्थ्यास कमाल 2 हे. पर्यंत लाभ देण्यात यावा.2. प्रशिक्षण –
ज्या शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून निवड केलेली आहे, त्यांना त्यांनी निवड केलेल्या भाजीपाल्याच्या पिकानुसार व गरजेनुसार प्रशिक्षणास उपस्थित रहायचे आहे.

3. भाजीपाला लागवडीसाठी बियाणे वापर –
भाजीपाला लागवड घटकांतर्गत अधिक उत्पादन देणाऱ्या, तसेच संकरित वाणांचा वापर करणे बंधनकारक आहे.

Related posts

Shares