Search

शीतगृह अनुदान योजना

शीतगृह अनुदान योजना

भारतीय कृषी क्षेत्राचा विचार केल्यास भाजीपाला आणि फळ उत्पादनात महाराष्ट्राचा महत्वाचा वाटा आहे. पण योग्य नियोजनाअभावी साधारण ३० ते ३५% उत्पादन वाया जाते. कारण कापणी नंतर फळे किंवा भाज्यांची योग्य साठवणी होत नाही, याचा परिणाम परिवहनादरम्यान शेतमालाचे नुकसान होते. परिणामी शेतमालास चांगला भाव मिळत नाही.
शेतात अविरत मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यास नुकसान सहन करावे लागते. जर शेतकऱ्यांना शीत गृहाची व्यवस्था उपलब्ध झाली तर या नुकसानावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. यामुळेच शेतीमालास चांगला भाव मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात शीतगृह असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन राज्य कृषी पणन मंडळाने १ ऑगस्ट २००४ रोजी शीतगृह अनुदान योजना लागू केली आहे.

योजनेचे स्वरूप

 • एकूण प्रकल्प खर्चाच्या २५ टक्के रक्कम जास्तीत जास्त रु. २.५ लाख रुपये भांडवली अनुदान
 • लाभार्थी पणन मंडळाशिवाय इतर संस्थांकडूनही अनुदान घेण्यास पात्र असतील
 • लाभार्थी एकापेक्षा जास्त शीतगृह बांधणार असेल तरीही तो या अनुदानास पात्र असेल

योजनेची वैशिष्ट्य

 • १०० मेट्रिक टन क्षमतेपर्यंत अनुदान उपलब्ध होईल
 • प्रकल्पाचा खर्च प्रति मेट्रिक टन क्षमतेसाठी रु. २५००/- या दराने अनुदान उपलब्ध होईल
 • प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य कृषी प्रमाण मंडळाकडून मंजूर होणे गरजेचे आहे
 • प्रकल्प अहवालाचा आराखडा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचाच असावा
 • महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने निश्चित केल्याप्रमाणेच प्रकल्पाचा आराखडा व खर्च असावा

लाभार्थी कोण असतील?

 • महाराष्ट्रात कार्यरत कृषी उत्पन्न बाजार समिती
 • पणन आणि प्रक्रिया क्षेत्रात कार्यरत विविध सहकारी संस्था
 • भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था
 • सहकारी साखर कारखाने तसेच शेती उत्पादक सहकारी संस्था

(सदर योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रवर्तक पात्र राहतील)

संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ

Related posts

Shares