Search

शेतकामाची अवजारे व यंत्रे

शेतकामाची अवजारे व यंत्रे

शेतीमध्ये मशागतीसह विविध कामे ही आता यंत्राच्या साह्यान केली जात आहेत.त्यासाठी विविध यंत्रे उपलब्ध असून,
त्याचा वापर केल्यास कामे वेगाने होऊन मजुरांच्या संख्येमध्ये बचत होते.

ट्रॅक्टरचलित तव्यांचा नांगर

 • नांगर पुढे चालण्याच्या दिशेला विशिष्ट कोनात तवे बसविलेले असतात.
 • नांगर चालताना हे तवे फिरत असतात त्यामुळे हा तव्याचा नांगर विशेषतः कडक जमिनीची नांगरणी करण्यास उपयुक्त पडतो.

ट्रॅक्टरचलित तव्यांचा कुळव

 • या कुळव्यात विशिष्ट कोनाकार ओळीवर तवे बसविलेले असतात.
 • हे तवे कुळव चालण्याचा दिशेला कोनाकार फिरतात.
 • तव्याचा कोन वाढवून जमिनीत अधिक खोलीपर्यंत काम करता येते नांगरणीनंतर
 • जमिनीत राहणारी ढेकळे फोडण्यासाठी या तव्यांचा कुळवाचा उपयोग होतो.

कल्टिव्हेटर:

 • पेरणीपूर्व मशागतीसाठी शेताची नांगरणी केल्यानंतर कुळवाप्रमाणेच कल्टिव्हेटरचा वापर करणे पेरणीसाठी जमीन तयार करण्याच्या कामी उपयुक्त ठरते.
 • कल्टिव्हेटर बैलचलित तसेच यंत्रचलित प्रकारचे वापरात आहेत.
 • कल्टिव्हेटरच्या वापरामुळे जमिनीतील ढेकळे फोडणे, तणांचे निर्मूलन करणे आणि जमीन भुसभुशीत करुन ती पेरणीयोग्य केली जाते.
 • बैलचलित कल्टिव्हेटरचा वापर पिकांच्या आंतरमशागतीसाठी सुद्घा करता  येतो.
 • तण निर्मूलनाबरोबरच पिकाला भर लावण्याचे कामही यामुळे होते.
 • बैलचलित कल्टिव्हेटरमध्ये ५ ते ७ फणांचा किंवा २-३ इंग्रजी ‘ व्ही ’आकाराच्या पात्यांचा वापर केला जातो.
 • ट्रॅक्टरचलित कल्टीवेटर साधारणतः ७,९,१३,१५ इ.टाइन्स असतात.

ट्रॅक्टरचलित पलटी नांगर

 • ट्रॅक्टरचलित पलटी नांगरामुळे जमीन कापली जाते, तसेच उचलून पलटली जाते.
 • परिणामी जमिनीची पोत राखला जातो. पेरण्यात येणाऱ्या बियांसाठी योग्य ती वातावरण निर्मिती तयार होते.

ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर

 • या यंत्रात क्षितिजसमांतर शाफ्ट असून, त्यावर विविध प्रकारची पाते बसवलेली असतात.
 • त्यामुळे जमिनीची चांगली मशागत होते. तसेच या यंत्राद्वारे जमीन पेरणीयोग्य तयार होते.

Related posts

Shares