Search

संकरीत भात लागवड भाग – १

संकरीत भात लागवड भाग – १

buttons eng-min

भात अर्थात तांदूळ हे भारतातील महत्वाचे अन्नधान्य आहे. यामुळेच भारतात विविध ठिकाणी मुख्यतः किनारपट्टी भागात भात लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण तेथील वातावरण हे भात लागवडीसाठी पोषक आहे. जर या पोषक वातावरणात संकरीत भात लागवड केली गेली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. संकरीत भात लागवड करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

पूर्व मशागत :

संकरीत भात लागवडीसाठी नेहमीच्या भात पिकाप्रमाणे पूर्वमशागत व रोपवाटिका व्यवस्थापन करावे. मात्र बियाण्यासाठी संकरीत भाताचे प्रती हेक्टरी २० किलो बियाणे वापरावे.

लावणी :

संकरीत भाताचे २० X १५ सें.मी. अंतरावर एका चुडात एकाच रोप लावावे.

कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या संकरीत जाती.

जात

कालावधी (दिवस)

उत्पन्न (क्वी. /हे.)

वैशिष्ट्य

सह्याद्री

125-130

65-70

लांब बारीक दाणा, कडा करपा रोगास मध्यम प्रतिकारक, किंचित सुवासिक

सह्याद्री 2

115-120

40-50

लांब बारीक दाणा, कडा करपा रोगास मध्यम प्रतिकारक, न लोळणारी

सह्याद्री 3

125-130

65-70

लांब बारीक दाणा, न लोळणारी व न गळणारी

सह्याद्री 4

110-120

60-65

लांब बारीक दाणा, कडा करपा रोगास मध्यम प्रतिकारक, न लोळणारी

सह्याद्री 5

140-145

62-66

लांब बारीक दाणा, करपा व विषाणूजन्य करपा रोगास मध्यम प्रतिकारक

खताचे व्यवस्थापन :

संकरीत भात पिकास हेक्टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. यापैकी ४० टक्के नत्र आणि पूर्ण स्फुरद व पालाश लावणीच्या वेळी द्यावे. दुसरा नत्राचा ४० टक्के हप्ता फुटवे येण्याच्या वेळी द्यावा. तिसरा २० टक्के नत्राचा हप्ता पीक फुलोऱ्यात असताना द्यावा.

आंतरमशागत व पाण्याचे नियोजन :

संकरीत भातासाठी आंतरमशागत व पाण्याचे नियोजन भात पिकाप्रमाणे करावे.

तणनाशकाचा वापर :

सुधारित भात पिकाप्रमाणेच तणनाशकाचा वापर करावा.

संकरीत भात बिजोत्पादन :

इतर भात जातीचे बियाणे तयार करण्याच्या पद्धतीपेक्षा संकरीत भात बियाणे तयार करण्याची पद्धत हि पूर्णतः वेगळी आहे. संकरीत भात बियाणे दरवर्षी बदलाने जरुरीचे असते. संकरीत बियाणे दोन भिन्न वाणांच्या संकरातून तयार केली जाते.

हंगाम :

खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात उत्पादन जास्त मिळते. खरीप हंगामामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी व रब्बी उन्हाळी हंगामात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी.

अंतर (विलानीकरण) :

संकरीत भात बिजोत्पादन प्रक्षेत्र हे इतर भात जातींच्या प्रक्षेत्रापासून १०० मीटर दूर असावे, किंवा लगतच्या दोन प्रक्षेत्रातील भात जातींच्या फुलोर्यांमध्ये २० ते २५ दिवसाचा फरक असावा.

रोपवाटिका व्यावासाथापन :

प्रक्षेत्राची निवड करताना शक्यतो पूर्वीच्या हंगामात भात पीक घातलेलेल नसावे, किंवा रोपवाटिका तयार करण्यापूर्वी प्रक्षेत्राला पाणी देऊन शेतात पडलेले भात उगवून द्यावे व हलक्या लोखंडी नागाराने नागरणी करावी. ढेकळे फोडून माती भुसभुशीत करावी. नंतर १२० सें.मी. रुंद, १० ते १५ सें.मी. उंच आणि उतारानुसार आवश्यक तितक्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत. एक गुंठ क्षेत्राच्या वाफ्यांना अर्धा टन याप्रमाणे शेणखत अथवा काम्पोस्ट द्यावे. एक हेक्टर क्षेत्राला पुरेशी रोपे मिळविण्यासाठी ०.१० हेक्टर क्षेत्रात रोपे तयार करावीत.

संदर्भ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

Related posts

Shares