Search

भाजीपाला पिके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये

भाजीपाला पिके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये

भाजीपाला पिकांच्या लागवडीदरम्यान पिकांना योग्य स्वरूपात अन्नद्रव्य मिळणे गरजेचे असते पिकांच्या विविध अवस्थेमध्ये अन्नद्रव्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. पहिल्या भागात आपण मूळ अन्नद्रव्ये तर दुसऱ्या भागात मुख्य अन्नद्रव्ये यांबाबत माहिती घेतली. भाजीपाला पिके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये या लेखाच्या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि त्यांची भाजीपाला पिकांमधील भूमिका काय असते, हे जाणून घेऊया.

लोह

 • वनस्पतीच्या पानांत हरितद्रव्य तयार होण्याच्या कामात लोह मदत करते.
 • वनस्पतीमध्ये प्राणवायू वाहून नेण्याचे काम लोह हा घटक करतो.
 • जमिनीत लोहाचा प्राणवायूशी संयोग होऊन जमिनीतील जिवाणूंच्या वाढीसाठी एक प्रकारची शक्ती निर्माण केली जाते.
 • लोह जमिनीतील प्राणवायू आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवतो.

तांबे

 • वनस्पतिंमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी तांबे या खनिजाचा अप्रत्यक्षरीत्या उपयोग होतो.
 • जमिनीत तांब्याची कमतरता असल्यास पिकावर ताम्रयुक्त रसायनाची फवारणी केल्यास पानामध्ये हरितद्रव्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
 • तांबे हे तीन प्रकारच्या पाचक रसांचा घटक आहे.
 • अमोनिया प्रकारच्या नत्रापासून प्रथिने तयार करण्याच्या कामात तांबे मदत करते.

मँगनीज

 • वनस्पतीमध्ये मँगनीज हा घटक प्राणवायुवाहक म्हणून काम करतो.
 • मँगनीज वनस्पतीच्या श्वासोच्श्वास क्रियेत मदत करतो.
 • मँगनीज उपयोगी पडणाऱ्या पाचक रसांचा मँगेनीज हा घटक आहे.
 • लोहाप्रमाणेच मँगनीज वनस्पतीच्या पानांतील हरितद्रव्य तयार करण्यास मदत करतो.
 • प्रथिने तयार करण्यासाठी लागणाऱ्या पाचक रसाचादेखील मँगनीज हा घटक आहे.

जस्त

 • वनस्पतीच्या शरीरातील अनेक पोषक पदार्थांचा जस्त हा महत्वाचा घटक आहे.
 • वनस्पतीच्या पानांत अप्रत्यक्षरीत्या हरितद्रव्य तयार करण्यासाठी जस्ताची मदत होते.
 • वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे प्रेरक पदार्थ तयार होण्यासाठी जस्ताची गरज असते.
 • या अन्नद्रव्यामुळे वनस्पती योग्य रीतीने पाणी शोषण करतात आणि शरीरात पाण्याचे योग्य प्रमाणात स्थलांतर होते.

बोरॉन

 • वनस्पतीमध्ये बोरॉनची कमतरता असल्यास अशा वनस्पती नायट्रेट रूपातील नत्र शोषण करून घेऊ शकत नाहीत.
 • बोरॉनच्या कमतरतेमुळे वनस्पतीच्या खोडाची आणि मुलांची वाढ खुंटते.
 • यामुळे मुळांच्या रचनेत अडथळा येतो.
 • बोरॉनच्या पुरवठ्यामुळे जीवाणूंना कारबीयूक्त पदार्थांचा पुरेसा पुरवठा होतो.
 • बोरॉनमुळे अझोटोबॅक्टर हे जिवाणू नत्राचे स्थिरीकरण अधिक प्रमाणात करतात.

मॅलीब्डेनम

 • वनस्पतीच्या पेशींमध्ये मॅलीब्डेनममुळे प्रथिने तयार होण्यास मदत होते.
 • वातावरणातील नत्र धरून ठेवण्याच्या क्रियेत मॅलीब्डेनमचे कार्य महत्वाचे असते.

क्लोरीन

 • या अन्नद्रव्याचे महत्वाचे कार्य म्हणजे प्रकाशजन्य संयोगात प्राणवायू उपलब्ध करून देणे.
 • कोबी, गाजर यासारख्या पिकांच्या वाढीसाठी क्लोरिनची आवश्यकता असते.

Related posts

Shares