Search

सोयाबीन लागवड

सोयाबीन लागवड
[Total: 25    Average: 2.9/5]

जगामध्ये गळीत धान्यामध्ये सोयाबीन लागवड सर्वात जास्त असुन हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीन मध्ये तेलाचे प्रमाण २०% व प्रथिनांचे प्रमाण ४०% आहे. भारतात सोयाबीनची लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात सरासरी ९०० मि. मी. पाऊस पडणाऱ्या भागात जिरायती परिस्थितीत केली जाते. सोयाबीननंतर रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, करडई ही पीक पद्धत अवलंबली जाते. सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या लेखात सोयाबीन पिकाबद्दल रंजक माहिती जाणून घेऊया.

सोयाबीन लागवडीमध्ये महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात साधारण ३.८७ दशलक्ष क्षेत्र सोयाबीन लागवडीखाली खाली आहे. यापैकी  विदर्भात २१. ३४ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन ची लागवड केली जाते. भारताचा विचार केल्यास सोयाबीनची सरासरी उत्पादकता १००० ते १२०० किलो प्रतिहेक्टरच्या आसपास आहे.

वाणांची निवड :

सोयाबीनच्या उत्पादनात स्थैर्य आणण्यासाठी दरवर्षी ३ ते ४ वाणांची लागवड करणे गरजेचे आहे. आपल्या विभागातील पाण्याची उपलब्धता, हवामान आणि होणारे वातावरणीय बदल लक्षात घेऊन योग्य वाणाची निवड करावी. पेरणी अगोदर योग्य नियोजन करून बियाण्यांची उपलब्धता करून ठेवावी.

जमीन :

सोयाबीनची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु, अत्यंत हलक्या हमीनीत अपेक्षित उत्पादन येत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तसेच रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये.

पूर्व मशागत :

पिकाच्या योग्य व्यवस्थापनासाठी जमिनीची २ ते ३ वर्षात किमान एकदा खोल नांगरणी करावी. पूर्वीच्या पीक काढणीनंतर उन्हाळ्यात एक खोल नांगरणी (३० ते ४५ सें. मी) करून नांगरणीच्या विरुद्ध दिशेत २ – ३ वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळीत करून घ्यावी. शेवटच्या वखर पाळीपूर्वी हेक्टरी २० गाड्या शेणखत (५ टन ) जमिनीत पसरून द्यावे.

हवामान:

सोयाबीन हे पीक उष्णता व पाण्याच्या ताणास संवेदनशील असे पीक आहे. हे पीक २० ते ३५ सेल्सीयस उष्णतामान व ७०० ते १२०० मि. मी. पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात उत्तम येते व सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा देखील पिकावर परीणाम होतो. खरीप हंगामात हे पीक चांगले येते.

पेरणी :

पेरणी खरीप हंगामात मॉन्सूनच्या आगमनावर अवलंबून असते. मराठवाडा विभागात सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत जमिनीत पुरेशी आर्द्रता आहे याची खात्री करून मगच करावी.

लागवडीचे अंतर व पद्धत :

  • सोयाबीनची पेरणी ४५ x ५ से. मी. किंवा ३० x ७. ५ सें. मी. अंतरावर पाभर किंवा ट्रॅक्टरचलित सीड ड्रिलच्या साहाय्याने करावी.
  • पेरणी करतेवेळी बियाणे २. ५ ते ३. ० सें. मी. खोलीपेक्षा जास्त खोल पेरू नये. अन्यथा बियाण्याची उगवण कमी होऊन उत्पादनात घट येऊ शकते.
  • मॉन्सूनच्या पावसाच्या आगमनास विलंब झाल्यास किंवा पेरणीस विलंब झाल्यास सोयाबीनच्या हळव्या वाणांची लागवडीसाठी निवड करून पेरणीसाठी प्रतिहेक्टरी २५ टक्के जास्त बियाणे वापरावे व दोन ओळींतील अंतर ३० सें. मी ठेवावे.

Related posts

Shares