Search

स्ट्रॉबेरी लागवड – भाग 2

स्ट्रॉबेरी लागवड – भाग 2
[Total: 9    Average: 2.3/5]

स्ट्रॉबेरी चे मधुर फळ तसं पाहायला गेलं तर परदेशी फळ पण हे भारतात आलं आणि इथलंच झालं. सुरुवातीला ठराविक ठिकाणीच  स्ट्रॉबेरीची शेती होत असे पण देशात आणि परदेशात या फळाला असलेली मागणी लक्षात घेता स्ट्रॉबेरी लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसते. आपल्या स्ट्रॉबेरी लागवडीच्या मागील भागात आपण स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठीच्या काही महत्वाच्या पैलूंवर प्रकाशझोत टाकला होता. या आधी आपण लागवड करण्यापूर्वी कोणती कामे करावी या बद्दल माहिती घेतली. या भागात आपण लागवड कशी करावी आणि लागवडीनंतर कोणती कामे करावीत याची माहिती घेऊया.

रोपांची गादीवाफ्यावर लागवड

 • स्ट्रॉबेरी चे पिक कोणत्याही हंगामात घेत येऊ शकते.
 • स्ट्रॉबेरीची लागवड उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही हंगामांत करता येते;
 • परंतु महाराष्ट्रातील ऑक्टोबर ते मार्च या कालावधीतील हवामान स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी पोषक आहे.
 • पश्चिम महराष्ट्रात पावसाळा झाल्यानंतर म्हणजे साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते
 • तर सपाट प्रदेशात पावसाळ्यादरम्यान म्हणजेचे जुलै-ऑगस्ट महिन्यात स्ट्रॉबेरीची लागवड करणे योग्य ठरते.
 • कारण या महिन्यामध्ये पावसाचा जोर थोडा मर्यादित असतो.
 • स्ट्रॉबेरी लागवडीसाठी गादिवाफ्यांची निर्मिती करावी.
 • यानंतर, तयार केलेल्या गादीवाफ्यांवर दोन ओळी पद्धतीने लागवड करण्यासाठी १ फूट x १ फूट अंतरावर खड्डे करून त्यात १५० ते २०० ग्रॅम चांगले कुजलेले शेणखत,
  ५ ग्रॅम मिथाईल पॅराथिऑन पावडर किंवा चिमूटभर फोरेट (१० जी) आणि आवश्यक रासायनिक खतांची मात्रा टाकून ते व्यवस्थित मिसळावे.
 • त्या मिश्रणात मध्यभागी मूठभर माती टाकून त्यात रोप लावावे.
 • प्लॅस्टिक पिशवीतील रोप असल्यास ती पिशवी काढून त्याच्या बुडातील थोडी माती मोकळी करून ते रोप लावावे.
 • रोपाचा सुरवा (कोंब) जमिनीत गाडला जाणार नाही याची काळजी घेऊन बाहेरील मातीने मुळे पूर्णपणे झाकावीत.

स्ट्रॉबेरी लागवड क्षेत्रात झाली वाढ

 • पूर्वी स्ट्रॉबेरी या फळपिकाची लागवड मर्यादित क्षेत्रावर आणि ठराविक थंड हवेच्या ठिकाणी (सिमला, महाबळेश्वटर, उटी) होत असे.
 • भारतामध्ये सर्वसाधारणपणे ८५० ते ९०० हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड होत असे.
 • मात्र केवळ महाराष्ट्रातच महाबळेश्वीर, पाचगणी, वाई, मेढा, गोरेगाव (जि. सातारा), चंदगड (जि. कोल्हापूर),पुणे, लोणावळा (जि. पुणे),
  नाशिक, इगतपुरी, सुरगाणा (जि. नाशिक ) व नागपूरकडील लागवड वाढली आहे. त्याचे एकत्रित क्षेत्र ९०० हेक्ट रपेक्षा अधिक आहे.

परदेशी जातींची लागवड

 • भारतामध्ये स्ट्रॉबेरीच्या काही देशी जाती उपलब्ध होत्या.
 • मात्र सन १९९०-९१ मध्ये कॅलिफोर्निया येथून सेल्वा,चॅन्डलर व पजारो या जाती लागवडीसाठी आयात करण्यात आल्या.
 • या नवीन जातींच्या लागवडीमुळे प्रति हेक्टारी उत्पादकता २.५ टनापासून ७.० टनांपर्यंत वाढलेली दिसून येते.
 • प्रत्यक्ष कॅलिफोर्नियन जातींची प्रति हेक्टीरी उत्पादनक्षमता ३०.० टनांपासून ५०.० टनांपर्यंत आहे. म्हणजेच भारतात प्रति हेक्टीरी स्ट्रॉबेरी फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविणे शक्य  आहे.

अशी हि हवीहवीशी स्ट्रॉबेरी जर योग्य नियोजन करून लागवड केली तर दर्जेदार उत्पादन येऊ शकते. आणि उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.

Related posts

Shares