स्मार्ट शेतकरी स्पर्धा

स्मार्ट शेतकरी स्पर्धा
[Total: 24    Average: 3.1/5]

देस्ता ग्लोबल तर्फे आयोजित स्मार्ट शेतकरी स्पर्धेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये निश्चित वाढ व्हावी या उद्देशाने देस्ता ग्लोबल ची स्थापना झाली. हे करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी संदर्भात आवश्यक मार्गदर्शन व्हावे यासाठी देस्ता टॉक या वेबसाईट ची सुरुवात झाली. मागील अडीच वर्षात देस्ता टॉक ने विविध उपक्रम राबविले. कृषी विषयक माहितीचा खजिना मोबाईल किंवा इंटरनेट वर उपलब्ध करून देतानाच बळीराजाचे मनोधैर्य वाढावे यासाठी विविध स्पर्धांचे देस्ता टॉक तर्फे वेळोवेळी आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेबाबत बोलताना देस्ता ग्लोबल चे सी. ई. ओ. श्री. सिद्धार्थ चौधरी यांनी “देस्ता टॉक च्या वाचकांना दर्जेदार माहितीबरोबरच आणखी काही देता येईल का? याचा आम्ही विचार करत होतो. सखोल चर्चेनंतर आम्ही स्मार्ट शेतकरी स्पर्धेचे आयोजन केले. याअंतर्गत विजेत्या शेतकऱ्यांना विविध बक्षिसे देऊन गौरविले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे या बक्षिसांचा शेतकरी बांधवांना उपयोग होईल यावर आम्ही लक्ष दिले आहे. देस्ता टॉक वर प्रसारित झालेल्या एखाद्या लेखावर आधारित प्रश्न शेतकऱ्यांना विचारला जाईल आणि त्याच उत्तर देणारा विजेता शेतकरी ‘स्मार्ट शेतकरी’ म्हणून निवडला जाईल. या स्पर्धेअंतर्गत ‘लक्की ड्रॉ’ पद्धतीने दोन शेतकऱ्यांना स्प्रे पंप बक्षीस म्हणून दिले जाणार आहे” असे सांगितले.

ड्रीप इरिगेशन (ठिबक सिंचन) क्षेत्रात कार्यरत “हिरा अग्रो इंडस्ट्रीज” ने देस्ता टॉकच्या या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला असून ते या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत दर आठवड्याला दोन याप्रमाणे एकूण आठ शेतकऱ्यांना बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे. शेतकऱ्यांनी ज्ञानार्जन करताना त्यांना बक्षीस दिल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. याआधी देखील देस्ता ग्लोबल कडून शेतकऱ्यांचा उत्साह वाढविणाऱ्या अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यके वेळी स्पर्धा घेताना त्यात वेगळेपणा काय करता येईल यावर देस्ता ग्लोबल कडून नेहमीच विचार केला जातो.

या स्पर्धेअंतर्गत पहिल्या आठवड्यातील विजेत्या शेतकऱ्यांच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली. या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील समीर शेख आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजेश केळझरकर विजयी ठरले आहेत. पहिल्या आठवड्यात या स्पर्धेत ३५०० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. दुसऱ्या आठवड्यातील स्पर्धा सध्या सुरु असून या स्पर्धेत आत्तापर्यंत २००० शेतकऱ्यांनी भाग घेतला आहे. स्पर्धा समाप्ती पर्यंत हा एकदा निश्चित वाढेल असा विश्वास देस्ता ग्लोबलच्या टीमला आहे. शेतकरी बांधवांसाठी हा अभिनव उपक्रम असून शेतकरी बांधव खालील लिंक वर क्लिक करून या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

Shares