Search

कसे कराल परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन ??

कसे कराल परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन ??
भाजीपाला उत्पादनात जगामध्ये भारत दुस-या क्रमांकाचा देश आहे. एवढेच काय जगाच्या एकुण उत्पादनाच्या १४% उत्पादन केवळ भारतातच होते. म्हणजेच भारतीय हवामान शेतीसाठी अनुकुल आहे. भाजीपाल्याच्या मागणीबरोबरच ब्रोकोली,आईसबर्ग(लेट्युस), चायना कोबी, सिलेरी, बेंझिल, झुकीनी, थायचिली, लिक, चाईव्ज इ. जीवनसत्त्वांनी युक्त परदेशी (एक्‍झॉटिक) भाज्यांना सॅलडसह विविध डिश तयार करण्यासाठी तसेच हॉटेलमध्येही वाढती मागणी आहे. त्यामुळेच या भाजीपाल्यांना विशेष वाव आहे.या भाजीपाल्या बाजारात विशेष... Read More

ऑक्टोबर महिन्याचे पिक व्यवस्थापन

ऑक्टोबर महिन्याचे पिक व्यवस्थापन
ऑक्टोबर  हा महिना शेती कामांसाठी अतिशय महत्वाचा महिना आहे. कारण रब्बी हंगामाची सुरुवातच या महिन्यापासुन होते. त्याचप्रमाणे काही भागात काही पिकांची काढणी व काढणीनंतरची कामे देखिल याच महिन्यात केली जातात. याच बरोबर वार्षिक, बहुवार्षिक पिकांसाठी आंतरमशागतीची म्हणजेच खतव्यवस्थापन, किड व्यवस्थापन, छाटणी, तण व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन इ. कामांना याच महिन्यात वेग येतो. म्हणुनच या कामांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोणत्या कामांना... Read More

नारळावरील रोगाचे नियंत्रण

नारळावरील रोगाचे नियंत्रण
१. करपा: काहीवेळा पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो, यामुळे पानावर लालसर-तपकिरी रंगाचे ठिपके पडून पाने पिवळी होतात, असे ठिपके पक्व पानावर अधिक असतात. सुरवातीला आकाराने लहान असणारे ठिपके मोठे होतात आणि एकमेकांत मिसळतात. परिणामतः संपूर्ण पान करपून जाते, त्यामुळे माड कमकुवत होऊन उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. उपाय : हा रोग पाण्याच्या आणि खताच्या कमतरतेमुळे बळावतो, म्हणून पावसाळ्यानंतर बागेला नियमित... Read More

बहुविध पिकातुन साधली समृद्धी

बहुविध पिकातुन साधली समृद्धी
अनियमित पाऊस, पाण्याची कमतरता, अचानक होणारा किड आणि रोगांचा हल्ला अशा अनेक अडचणी विदर्भातील शेतक-यावर उद्भवतात. विदर्भात शक्यतो कापुस हे मुख्य पिक असुन त्यापाठोपाठ संत्रा,मोसंबी, सोयाबीन, ज्वारी, केळी इ. पिके घेतली जातात. हि सर्व पिके किडी व रोगांना सहज बळी पडणारी असल्यामुळे नेहमीच शेतक-याला जोखिम पत्करावा लागतो. तसेच बाजारभावाची शाश्वतीही मिळणे कठीण.   यावर पर्याय म्हणुन लाडकी बुद्रुक गावातील मुळशी... Read More

एक सकारात्मक पाऊल : घडविला कृष्णा – गोदावरीचा संगम

एक सकारात्मक पाऊल : घडविला कृष्णा – गोदावरीचा संगम
एके ठिकाणी संपुर्ण शेती पुराखाली वाहुन गेली तर एकीकडे पिण्यासाठीही पाणी नाही अशी अवस्था देशभ रात झाली असतानाच, त्यावर मात करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल पडले आहे. आंध्रप्रदेशातील गोदावरी आणि कृष्णा या दोन महत्वाच्या नद्यांना जोडण्यात आले. या नदीजोडमुळे गोदावरीतील 80 टीएमसी  कालव्यातून कृष्णा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी इब्राहिमपटणम येथे पूजा करून या उपक्रमाचा प्रारंभ... Read More

नारळावरील किड नियंत्रण

नारळावरील किड नियंत्रण
नारळ हे देशातील एक प्रमुख पीक आहे. नारळाच्या झाडावर शंभरपेक्षा जास्त प्रकारच्या किडींची नोंद करण्यात आली आहे; ज्यामुळे नारळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यापैकी गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा आणि काळ्या डोक्याची अळी या किडी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.नारळ पिकावरील किडींचे नियंत्रण कसे करावे; हे जाणून घ्या! १) गेंड्या भुंगा लक्षणे: हा भुंगा नारळाच्या झाडाच्या शेंड्यामधून नवीन येणारा कोंब खातो, त्यामुळे... Read More

राष्ट्रिय अभियंता दिन विशेष : ह्यांनी रचिला पाया भारतात जलसिंचनाचा “डॉ. मोक्षगुंडन विश्‍वेश्‍वरेय्या”

राष्ट्रिय अभियंता दिन विशेष : ह्यांनी रचिला पाया भारतात जलसिंचनाचा “डॉ. मोक्षगुंडन विश्‍वेश्‍वरेय्या”
स्वातंत्र्यपुर्व काळातील अनेक ऐतिहासिक वास्तु आपण बघतो आणि इंग्रजांच्या काळात झाल्या असल्यामुळे त्यांच्या बांधकाम शास्त्रातील निपुणतेचे आपण  तोंडभरुन कौतुक करतो. परंतु जे त्यांना जमते ते आपल्याला का जमु नये? हा प्रश्न त्यांच्या मनात आला आणि आपणही हे करुन दाखवायचे असा चंग त्यांनी मनात बांधला. ह्यातुनच स्वातंत्र्यपुर्व भारताला जलसिंचन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा  एक महान अभियंता, विचारक, शास्त्रज्ञ जन्माला आला... Read More

मुल्यवर्धनासाठी करा – फळ – भाजीपाल्याचे निर्जलीकरण – Dehydration

मुल्यवर्धनासाठी करा – फळ – भाजीपाल्याचे निर्जलीकरण – Dehydration
भारत हा देश भाजीपाला व फळांच्या उत्पादनात जगात दुस-या क्रमांकावरचा देश आहे. जगाच्या एकुण उत्पादनाच्या जवळ जवळ १५% भाजीपाल्याचे उत्पादन एकट्या भारत देशात घेतले जाते. हि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे असले तरी, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार एकुण उत्पादनाच्या १८% उत्पादनाची नासाडी ही उत्पादनाची योग्य हातळणी न केल्यामुळे झाली. फळे व भाजीपाल्याचा नाशवंत गुणधर्म असल्यामुळे भाजीपाल्याची नासाडी तर होतेच त्याचबरोबर शेतक-याचही... Read More

शेतमाल प्रक्रिया उद्योग : काळाची गरज

शेतमाल प्रक्रिया उद्योग : काळाची गरज
“भारत हा कृषिप्रधान देश आहे, ७० टक्के जनता हि शेतीवर अवलंबुन आहेत” हे वाक्य आता बोलुन बोलुन गुळगुळीत झाले आहे. वास्तविक पाहता सद्यस्थितीत ५३% लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेती व्यवसायावर अवलंबुन आहे. वाढते औद्योगीकरण, शहरीकरण, माहीती तंत्रज्ञानातील क्रांती, सेवा विभागातील विकास या गोष्टी कृषी क्षेत्राचे स्थलांतर करण्यास कारणीभुत असतीलच पण हवानातील अनियमीतपणा, शेती बाजाराला योग्य भाव न मिळणे, अल्पभुधारकता एक... Read More

अवर्षण काळातील ऊसाचे पीक व्यवस्थापन

अवर्षण काळातील ऊसाचे पीक व्यवस्थापन
भारतातील ऊस पिकाखालील एकूण क्षेत्राच्या (५१.५० लाख हे.) २०.४६ टक्के क्षेत्र (१०.५४ लाख हे.) महाराष्ट्र राज्यात होते. देशातील एकूण ऊस उत्पादनाच्या (३५५३ लाख टन) १९.०३ टक्के उत्पादन (६७६.३७ लाख टन) महाराष्ट्र राज्यात होते. असे असले तरी ऊसाच्या उत्पादनासाठी पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे व पावसाची अनियमितता व जलसिंचनाच्या अपु-या सोयी यामुळे ऊस उत्पादकांवर सध्या टांगती तलवार  निर्माण झाली आहे.... Read More